शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

आयमा निवडणूक : घाईघाईने उमेदवार जाहीर करणे आले अंगलट उमेदवारीबाबत सर्वसहमतीचे प्रयत्न सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 01:25 IST

सिडको : सत्ताधारी एकता पॅनलने सर्वांना विश्वासात न घेता घाईघाईने अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केल्याने दुसऱ्या गटाच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या गटाने नाराजी व्यक्त केली.

ठळक मुद्देसत्ताधारी गटाने घाईघाईने घेतलेला निर्णय अंगलटउमेदवारी करावयाची याबाबत चर्चा करण्यात आली

सिडको : सत्ताधारी एकता पॅनलने सर्वांना विश्वासात न घेता घाईघाईने अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केल्याने दुसऱ्या गटाच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या गटाने नाराजी व्यक्त केली. सत्ताधारी गटाने घाईघाईने घेतलेला निर्णय अंगलट आल्याचे पाहून मंगळवारी (दि. ७) आयमाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांनी पुन्हा बैठक बोलावली. सदरची बैठक सर्व कार्यकारिणी सदस्य, पदाधिकारी व माजी अध्यक्षांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीत निवडणुकीसाठी इच्छुक असणाºया सर्वांची मते जाणून घेत उमेदवारास कोणत्या पदासाठी उमेदवारी करावयाची याबाबत चर्चा करण्यात आली. अंबड इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) या औद्योगिक संघटनेच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी एकता पॅनलच्या वतीने सर्वांना विश्वासात न घेता काही माजी अध्यक्षांच्या उपस्थितीत बैठक घेतली. या बैठकीत सत्ताधारी एकता पॅनलच्या वतीने अध्यक्षपदासाठी वरुण तलवार यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. यामुळे नाराज झालेल्या एकताच्याच दुसºया गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार तुषार चव्हाण यांनी मागील निवडणुकीत आपल्याला अध्यक्षपदाचा दिलेला शब्द पाळला गेला नसल्याचा आक्षेप घेत रविवारी (दि. ६) आयमाचे संस्थापक अध्यक्ष भास्कर कोतवाल, शशिकांत जाधव, मार्गदर्शक सुनील बागुल, माजी अध्यक्ष रमेश वैश्य, योगेश कनानी, प्रवीण अहेर, संजीव नारंग, विवेक पाटील, जे. जी. शिर्के, जी. आर. वाघ, एन. टी. ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेतली. याआधी अनेक वर्षे झालेल्या निवडणुका ह्या सर्वसंमतीने आणि वरिष्ठांच्या मध्यस्थीने बिनविरोध करण्याची परंपरा पार पाडण्यात आली आहे. यंदादेखील ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या हालचाली सुरू असल्या, तरी एकताच्याच दुसºया गटाला यात विश्वासात न घेतल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी राजेंद्र अहिरे यांनी आज पुन्हा एका हॉटेलमध्ये बैठक घेत दोन्ही गटांकडील इच्छुकांची मते आजमावून घेत कोण कोणत्या पदासाठी इच्छुक आहे याबाबत चर्चा करण्यात आली.अध्यक्षपदासाठी चव्हाण यांची दावेदारी शक्यगेल्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेले उमेदवार तुषार चव्हाण यांना वरिष्ठांनी पुढील निवडणुकीत अध्यक्षपदाचा शब्द दिल्याने व चव्हाण यांनी माघार घेतल्याने राजेंद्र अहिरे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. असे असताना पुन्हा होऊ घातलेल्या निवडणुकीतही त्यांना डावलत वरुण तलवार यांचे नाव घोषित करण्यात आले. दिलेला शब्द पाळला जात नसल्याबद्दल तुषार चव्हाण यांनी खंत व्यक्त केली असल्याने निवडणुकीत अध्यक्षपदासाठी चव्हाण हे दावेदारी आणि उमेदवारी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.