शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
6
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
7
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
8
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
9
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
10
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
11
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
12
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
13
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
14
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
15
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
16
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
17
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
18
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
19
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
20
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान

मी जिवंत आहे, मला पुरून टाकलंय...

By admin | Updated: November 24, 2015 22:52 IST

अनोखे आंदोलन : भारतीय जनता पार्टी व शिवरुद्र प्रतिष्ठानने वेधले लक्ष

सिडको : मीजिवंत आहे, पण मला पुरले आहे... मला वाचवा अशी भाविक साद घालणाऱ्या प्रतीकात्मक विहीर मातेची मूर्ती तयार करून जगण्यासाठी आटापिटा करणाऱ्या विहिरीची व्यथा मांडणारे अनोखे आंदोलन करण्यात आले.बुजविण्यात आलेली जिवंत विहीर पुन्हा खुली करावी, यासाठी भारतीय जनता पार्टी क्रीडा आघाडी व शिवरुद्र प्रतिष्ठानच्या वतीने बुजविलेल्या विहिरीच्या जागेवर प्रतीकात्मक विहीर तयार करून महापालिकेचे लक्ष वेधले आहे. अंबड-डीजीपीनगर क्रमांक २ येथील सिद्धिविनायक गृहनिर्माण सोसायटीच्या अध्यक्षांनी सभासदांना विश्वासात न घेता याठिकाणी असलेली जिवंत विहीर महापालिकेस हाताशी धरून बुजविली असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदेश भाजपा क्रीडा आघाडीचे सदस्य याज्ञिक शिंदे यांनी आवाज उठविला आहे. सदर विहिरीचा कोणालाही त्रास नसताना. तसेच या विहिरीतील पाण्याचादेखील वापर होत असताना विहिर बुजविण्यात आली आहे. सध्या सर्वत्र पाणीटंचाई जाणवत असताना मनपा प्रशासनाने सदरची जिवंत विहीर बुजविल्याने परिसरातील रहिवाशांनीदेखील नाराजी व्यक्त केली आहे. पाण्याचा निसर्गनिर्मित स्त्रोत बंद करण्याचा अधिकार कुणालाच नसतानाही तो बंद करण्याचा प्रकार सिद्धिविनायक गृहनिर्माण सोसायटीच्या अध्यक्षांनी केल्याचा आरोप पत्रकाद्वारे करण्यात आला आहे. सिनेकलावंत जयवंत वाडकर यांनीही याठिकाणी भेट देऊन जिवंत विहीर बुजविल्याबाबत नाराजी व्यक्त केली. याबाबत महापौर, मनपा आयुक्त, विभागीय अधिकारी यांना कळवूनही दखल घेतली नसल्याने बंद करण्यात आलेल्या जिवंत विहिरीजवळच प्रतीकात्मक विहीर तयार करून आगळ्या-वेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी याज्ञिक शिंदे यांच्यासह प्रवीण येवले, कुलदीप बाविस्कर, प्रशांत जाधव, शुभम जुन्नरे, मयूर दीक्षित, किरण गायकवाड आदि उपस्थित होते. (वार्ताहर)