शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

६.५० लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

By admin | Updated: February 3, 2017 00:51 IST

राज्य उत्पादन शुल्क : भरारी पथकाची कामगिरी; पाच ठिकाणी छापे

नाशिक : महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारी अवैध मद्याची वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने भरारी पथके तयार केली होती़ या भरारी पथकांनी बुधवार (दि़ १) ते गुरुवार (दि.२) या दोन दिवसांत पाच विविध ठिकाणी कारवाई करून ६ लाख ३२ हजार ११५ रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केला आहे़रिक्षाद्वारे (एमएच १५, झेड ७८४७) अवैध मद्याची वाहतूक करणारा संशयित दीपक महाले यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी शालिमार चौकातून बुधवारी (दि़१) ताब्यात घेतले़ त्याच्या रिक्षामध्ये ५७ हजार ३१२ रुपयांचा देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या होत्या़ संशयित महाले यास अटक करण्यात आली असून, रिक्षा व मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे़ भरारी पथकाने दुसरी कारवाई त्र्यंबकेश्वर-अंबोली रस्त्यावर केली असून, एका कारमधून (एमएच १५, डीएस ९३७) ३ लाख ७४ हजार रुपयांचा देशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे़ याप्रकरणी संशयित अनिल चव्हाण यास अटक करण्यात आली आहे़ पंचवटीतील वाघाडी परिसरातील वाल्मीकनगरमध्ये असलेल्या घर नंबर एफ ५२ मध्ये भरारी पथकाने गुरुवारी (दि़२) छापा टाकला़ या ठिकाणी अवैध मद्य, रिकाम्या बाटल्या, प्लॅस्टिकचे बॅरेल, मद्याच्या बाटलीचे पॅकिंग मशीन, बुच तसेच बनावट मद्यासाठी लागणारा साठा व साहित्य जप्त केले़ राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, पोलीस अधीक्षक आर. जी. आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय भरारी पथकांनी ही कारवाई केली आहे़ (प्रतिनिधी)