शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

अवैध गुटखा विक्री सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:12 IST

प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन नाशिक : निर्बंधातून व्यवसायाला सूट देण्यात आली असली तरी कोरोना अजूनही संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी बेफिकीरपणे ...

प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन

नाशिक : निर्बंधातून व्यवसायाला सूट देण्यात आली असली तरी कोरोना अजूनही संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी बेफिकीरपणे वागू नये, बाजारात विनाकारण गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. परंतु नागरिकांकडून या आवाहनाला प्रतिसाद दिला जात नसल्याचे दिसते.

त्र्यंबक रस्त्यावर पुन्हा वर्दळ

नाशिक : गेल्या महिनाभरापासून असलेले निर्बंध काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुन्हा एकदा वर्दळ वाढली आहे. मंगळवारी पहिल्याच दिवशी चारचाकी वाहनधारकांची त्र्यंबकेश्वरच्या रस्त्यावर वर्दळ दिसून आली. या मार्गावरील ढाबे, हॉटेल्सही सुरू झाले आहेत.

डाळींचे दर उतरल्याने दिलासा

नाशिक : सरकारने आयात शुल्क हटविल्यामुळे डाळींच्या किमती कमी झाल्या आहेत. क्विंटलमागे साधारणपणे २०० ते ५०० रुपये दर कमी झाल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे. इतर किराणा मालाचे दरदेखील उतरल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

शहरात येणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय

नाशिक : खरीप हंगामासाठी शेतकरी तयारी करीत असून त्यांना शेतकामासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी शहरात यावे लागते. मात्र वाहतूक साधने कमी असल्याने तसेच शहरातील काही मार्ग बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. पोलिसांकडून दंड आकारला जात असल्याने त्यांना भुर्दंड सोसावा लागतो.

उपनगर भरवस्तीत मद्य दुकानांचा उपद्रव

नाशिक : उपनगर येथील काॅलनी परिसरात असलेल्या मद्य दुकानांमुळे येथील रहिवाशांना मद्यपींचा त्रास सहन करावा लागत आहे. महिला वर्ग तसेच लहान मुलांना या दुकानांमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अनेकदा तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने स्थानिकांनी शासकीय यंत्रणेविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

नाशिक : आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी नियोजन करण्यात आले आहे. पेरणी, कीड नियंत्रण, पाण्याचा वापर आदींबाबत तंत्रशुद्ध मार्गदर्शन करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा उपक्रम हाती घेतला जाणार आहे.

वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार

नाशिक : शहरात गेल्या दोन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. वीजतारांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी वीजपुरवठा खंडित केला जातो आहे असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात कामे नसतानाही वीजपुरवठा विस्कळीत होत असल्याची नागरिकांनी तक्रार आहे.

तरुणांचे मास्क वापराकडे दुर्लक्ष

नाशिक: कोरोनाचे संकट कमी झालेले असले तरी संपलेले नाही, मात्र तरीही अनेक नागरिक बेफिकिरीने वागत असल्याचे दिसते. शहरात अनेक ठिकाणी तरुण मास्क वापराकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. तरुण मित्र एकत्र आल्यानंतरदेखील मास्क वापराबाबत बेफिकिरी करीत आहेत.

शेतकामांसाठी मजूरही मिळेना

नाशिक : कोरोनामुळे गावी परतलेले मजूर तसेच कोरोनाच्या भीतीमुळे कामावर येण्यास मजूर तयार नसल्याने शेतकऱ्यांना मजुरांची अडचण भासत आहे. विशेषत: शहरालगत असलेल्या शेतकऱ्यांना मजुरांची शोधाशेाध करावी लागत आहे.