शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

दुर्लक्ष : जलशुद्धीकरण केंद्रात साहित्याचा तुटवडा

By admin | Updated: October 30, 2014 22:31 IST

सिन्नरला दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा

सिन्नर : गेल्या काही दिवसांपासून शहर व उपनगरात दुर्गंधीयुक्त व बेचव पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार विरोधी गटनेते विजय जाधव व नगरसेवक शैलेश नाईक यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे. जलशुद्धीकरण केंद्रातील टीसीएल पावडर, आलम व क्लोरीन संपुष्टात आले असून, त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच नागरिकांना दुर्गंधीयुक्त व बेचव पाणी पिण्याची वेळ आल्याची तक्रार त्यांनी केली आहे.दारणा नदीपात्रातून पाणी उपसल्यानंतर माळेगाव औद्योगिक वसाहतीतल्या नाशिक-पुणे महामार्गालगतच्या मोहदरी वनउद्यानातील जलशुध्दीकरण केंद्रात पाण्याचे शुद्धीकरण केले जाते. त्यानंतर शहरात पाणीपुरवठा केला जातो. मात्र गेल्या काही दिवसांपासून, पिवळसर दिसणाऱ्या पाण्याला वास येत असून, ते बेचव लागत असल्याची तक्रार करण्यासाठी जाधव व नाईक पालिका कार्यालयात गेले होते. मात्र मुख्याधिकारी, पाणीपुरवठा अभियंता या जबाबदार अधिकाऱ्यांची भेट झाली नाही. यावेळी त्यांनी चौकशी केली असता जलशुद्धीकरण केंद्रातील टीसीएल पावडर, आलम व क्लोरीन संपले असल्याचे सांगण्यात आल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, यासंदर्भात पाणीपुरवठ्याचे कर्मचारी कमलाकर ओतारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दोन दिवसांपूर्वी केवळ क्लोरीन गॅस संपले असल्याचे सांगितले. एक-दोन दिवसात तो उपलब्ध होईल, अशी माहिती दिली.