शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
3
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
4
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
6
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
7
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
8
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
9
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
10
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
11
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
12
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
13
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
14
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
15
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
16
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
17
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
19
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
20
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक

सत्तेच्या संगीत खुर्चीत कामांकडे दुर्लक्ष

By admin | Updated: July 11, 2014 00:51 IST

सत्तेच्या संगीत खुर्चीत कामांकडे दुर्लक्ष

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक नगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत सदस्य अनुपस्थित राहिल्याने कोरम पूर्ण होऊ शकला नाही. पर्यायाने पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष यशोदा अडसरे यांना सभा तहकूब करण्याचा निर्णय घ्यावा लागला. याचा परिणाम सिंहस्थ कामाच्या निविदा उघडता न आल्याने महत्त्वाचे निर्णय घेता आले नाहीत. तसेच गावाच्या जिव्हाळ्याशी संबंधित असलेल्या सिंहस्थ समिती स्थापन करण्याचाही निर्णयही घेता आला नाही.यासंदर्भात चौकशी केली असता विद्यमान नगराध्यक्ष अडसरे यांनी आपापसातील रोटेशननुसार आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि ठरल्यानुसार दुसऱ्याला संधी द्यावी या कारणास्तव निषेध म्हणून सभेला उपस्थित राहिले नसल्याची शहरात चर्चा आहे. या राजीनामानाट्यात गावचे विकासाचे निर्णय मात्र प्रलंबित राहिले आहे. यासंदर्भात विरोधी पक्षाचे गटनेते रवींद्र (बाळा) सोनवणे म्हणाले, या विशेष सर्वसाधारण सभेस सत्तारूढ गटाने उपस्थित राहणे गरजेचे असताना संगीत खुर्चीच्या खेळात केवळ सिंहस्थ कामे आपल्याच कार्यकाळात व्हावीत म्हणून हा राजीनामा घेण्याचा अगर राजीनामा न देण्याचा आटापिटा चालू आहे. गावाशी काहीच देणे-घेणे नसल्याची कडवट टीका सोनवणे यांनी केली. सध्या सत्तारूढ गटात केवळ एका मताचे बहुमत असून, विरोधी गटाकडे आठ सदस्य आहेत. स्वीकृत सदस्य सत्तारूढ गटाकडून असून, कदाचित राजकारणाची समीकरणे बदलण्याचीही शक्यता शहरात वर्तविली जात आहे. शहर व आगामी कुंभमेळ्याशी कोणाला काही देणे-घेणे नसल्याचीही शहरात चर्चा आहे. (वार्ताहर)