येवला : तालुक्यातील जळगाव नेऊर परिसरात अवैध धंद्यांना उत आला असून या बाबत अनेक वेळा तक्रारी करुनही उपयोग होत नसल्याने दि. १३ पासून अवैध धंदे बंद होत नाही तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे निवेदन पुरणगावचे माजी सरपंच बाबासाहेब थेटे यांनी तहसिलदार शरद मंडलिक यांना दिले आहे.जळगाव नेऊर येथे दुरक्षेत्न ग्रामीण पोलीस कार्यालय असून स्थानिक ठिकाणी पोलीस कर्मचारी राहत नाही. परंतु त्यांच्या आशीर्वादाने गावात अवैध दारु विक्री, जुगार खुलेआम चालु आहे. पोलीस आणि अवैध धंदे करणार्यांचे ह्यअर्थह्ण पूर्ण संबंध कसे आहेत, अवैध व्यवसाय कशा प्रकारे चालतो याचे चित्नीकरणच आपण केले असल्याचा दावा आंदोलनकत्यांनी केला आहे.दुरक्षेत्न ग्रामीण पोलीसांना अवैध धंद्यांबाबत वेळोवेळी प्रत्यक्ष सांगीतले परंतु अवैध व्यवसाय करणार्यांशी ह्यअर्थह्णपूर्ण संबंध असल्याने कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. उलट याबाबत तक्र ार करण्यांची नावे अवैध व्यवसाय करणार्याला सांगितली जातात. त्यामुळे बर्याच वेळा गावात वाद झाले. असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.अवैध व्यवसायाबाबत पोलीसांकडे तक्रार केल्यास संबधित पोलिस अवैध व्यवसाय करणार्याला फोनद्वारे अगोदर सुचना देतात मग छापा टाकतात व तक्रारकर्त्यांना सांगतात की आम्हाला पुरावा मिळाला नाही त्यामुळे कारवाई करु शकत नाही. त्यामुळे आम्ही चित्नीकरण करु न सर्व पुरावे गोळा केले आहे. असे थेटे यांनी निवेदनात नमुद केले आहे.वरील बाबत त्वरीत निर्णय घेवून कारवाई करावी. दुरक्षेत्न ग्रामीण पोलीस कर्मचार्यांनी स्थानिक राहण्याची सक्ती करावी अन्यथा मंगळवार दि. १३ ऑक्टोबर रोजी जळगाव नेऊर येथे सकाळी ९ वाजता निर्णय होत नाही तोपर्यंत रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात दिला आहे. निवेदनावर राष्ट्रवादीचे बाबा थेटे, नामदेव वाघ, संजय कुर्हाडे, सुमन वाघ, सखुबाई वाघ, दौलत वाघ, तान्हाबाई वाघ, ताराबाई कुर्हाडे, सुखदेव कुर्हाडे, लक्ष्मण कुर्हाडे, कमळबाई कापसे, बाळु कोकणे, सुरेश वाघ, मच्छिंद्र वाघ, महेश कुर्हाडे, कचरु गाढे, रामदास गोधडे, अंबादास पवार, समाधान पवार, वैशाली बागुल, सुनीता मेथे, सविता आहिरे, अर्चना मेथे, शोभा भागवत आदींच्या स्वाक्षर्या आहे. (वार्ताहर)
जळगाव नेऊर परिसरातील अवैध धंद्यांकडे डोळेझाक
By admin | Updated: October 10, 2015 23:02 IST