शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

दुर्लक्ष : अवनखेड येथील पुलाचे काम निकृष्ट

By admin | Updated: July 26, 2016 21:53 IST

कळवण-नाशिक रस्त्यावर खड्डे

दिंडोरी : नाशिक-कळवण रस्त्यावरील अवनखेड येथील तीन महिन्यांपूर्वी वाहतुकीसाठी खुला केलेल्या नवीन पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून, सदर पुलाला जोडणाऱ्या रस्त्याही खड्डेमय झाला आहे. रस्ता व पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, पहिल्याच पावसाने रस्ता पूर्णत: उखडला आहे. या खड्ड्यांमुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.अवनखेड येथील पूर्वीच्या अरुंद पुलावर अनेकवेळा अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला. त्यानंतर येथे नवीन पूल बांधण्यात आला. रस्ता खासगीकरणातून झाला; परंतु त्यातून पूल वगळला गेला होता. अखेर सदर ठिकाणी बांधकाम विभागाने नव्याने पूल करत जुन्या व नव्या पुलावरून एकेरी वाहतूक नुकतीच तीन महिन्यांपूर्वीच सुरू केली होती; मात्र पुलाच्या दुतर्फा नवीन रस्ता निकृष्ट दर्जाचा झाल्याने पाऊस होण्यापूर्वीच तो खराब होऊ लागला होता. जोरदार पाऊस होताच त्यावर खड्डे पडले असून, वाहनधारकांची गैरसोय होत आहे. या रस्त्याने दररोज हजारो वाहने जात येत असून, खड्डे टाळण्यासाठी आता काही वाहनधारक पुन्हा जुन्या पुलावरून जात असून, त्यामुळे किंवा रात्रीच्या वेळी खड्डे ना दिसल्यास वाहने आदळून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र याच्या दुरुस्तीकडे बांधकाम विभाग पूर्ण दुर्लक्ष करत असून, सदर कामाची चौकशी करत संबंधित ठेकेदार यांच्याकडून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे तसेच नाशिक - कळवण रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, ते दुरुस्त करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)