शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरी तालुक्यात श्रमजीवींचा भर पावसात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 16:24 IST

वैतरणानगर : वावीहर्ष येथील युवकाच्या मृतदेहाचे जागेवरच शवविच्छेदन करण्यास नकार देणाऱ्या वैद्यकीय अधिका-यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र ...

वैतरणानगर : वावीहर्ष येथील युवकाच्या मृतदेहाचे जागेवरच शवविच्छेदन करण्यास नकार देणाऱ्या वैद्यकीयअधिका-यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र वैतरणा येथे श्रमजीवी संघटनेच्यावतीने बुधवार, दि. ११ रोजी भरपावसात आंदोलन करण्यात आले. तालुका वैद्यकीय अधिकारी एम बी देशमुख यांनी स्वत: या ठिकाणी येऊन लेखी कारवाईचे पत्र दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.गुरूवार दि. ५ रोजी सकाळी मासेमारी करण्यासाठी वावीहर्ष येथील पिंटु वाळु शिद (२०) हा युवक पाण्यात बुडाल्याचा संशय होता. या युवकाचा शोध तब्बल पाच दिवस प्रशासन व स्थानिकांच्या मदतीने सुरू होता. पाच दिवसांनी सोमवार दि. ९ रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास या युवकाचा मृतदेह धरणाचे पाणी सोडल्याने धरणाच्या प्रवाहाजवळ सापडला. पाच दिवस युवकाचा मृतदेह पाण्यात असल्याने या मृतदेहाचे शवविच्छेदन जागेवर होणे अपेक्षित होते यासाठी पोलिस प्रशासनाने जवळील वैतरणा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. एस. लचके यांना फोन करून पाचारण केले मात्र संबधित अधिकाºयाने मी नाशिकला जात असल्याने येऊ शकणार नाही असे उत्तर दिले. व यानंतर संबधित वैद्यकीय अधिकार्यांने फोन बंद केला. मात्र यावेळी श्रमजीवी संघटना व मृताच्या कुटुंबाने वैद्यकीय अधिकारी शवविच्छेदनासाठी आल्या शिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला होता. चार तासानंतर पोलिस प्रशासनाने मध्यस्थी केल्यानंतर मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी घोटी येथे पाठवण्यात आला होता. भरपावसात श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटनीस भगवान मधे यांच्या नेतृत्वाखाली वैतरणा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. तालुका वैद्यकीय अधिकारी एम बी देशमुख यांनी जिल्हा वैद्यकीय अधिकार्यांच्या स्वाक्षरीचे लेखी पत्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सुपुर्द केल्यानंतर आंदोलन स्थिगत करण्यात आले. या पत्रात महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम १९७९ चा नियम ३ चा भंग या नियमानुसार कारवाई करणार असल्याचा उल्लेख आहे.या आंदोलनात भगवान डोखे , तानाजी कुंदे , शांताराम भगत,संतु ठोम्बरे, तानाजी शिद, बाबुराव बांगारे, सुरेश पुंजारे , नामदेव बांगारे , संजय पारधी , पिंटू गांगड, चिमाबाई शिद , शेवंताबाई बांगारे ,अंकुश मधे , हिरामण सराई, हनुमंत गिरे, शांताराम पिंगळे , लखन डोखे, शिवाजी दराने , सुभाष मधे आदींसह संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :Nashikनाशिक