शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरी पालिका निवडणूक सर्वच पक्ष उमेदवारांच्या चाचपणीत व्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:12 IST

इगतपुरी नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजल्याने नागरिकांत उत्सुकता निर्माण झाली आहे. जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडणूक हे यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य आहे.

ठळक मुद्देयंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणारप्रभागातून उमेदवारी मिळण्यासाठी मोठी दमछाकभाजपा विकासाच्या मुद्द्यावर रिंगणात उभी

इगतपुरी : इगतपुरी नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजल्याने नागरिकांत उत्सुकता निर्माण झाली आहे. जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडणूक हे यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य आहे. नगराध्यक्षपद सर्वसाधारण असल्याने इच्छुकांची भाऊगर्दी पहावयास मिळत असल्याने यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार हे नक्की.इगतपुरी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी नऊ प्रभागांची निर्मिती करण्यात आली असून, यातून प्रत्येकी दोन असे अठरा सदस्य निवडून द्यायचे आहे. सर्वच पक्ष विजयासाठी गणित मांडण्यात व्यस्त आहे. अनेक इच्छुकांची प्रभागातून उमेदवारी मिळण्यासाठी मोठी दमछाक होत आहे, तर काही प्रभागामध्ये उमेदवारांची भाऊगर्दी झाल्याने मोठी डोकेदुखी ठरली आहे. शिवसेना, भाजपा, इगतपुरी शहर परिवर्तन आघाडी व कॉँग्रेस सर्वच जागा लढणार असल्याने पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. मात्र राष्ट्रवादी, मनसे, रिपाइंची काय भूमिका असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात भाजपा-शिवसेनेची युती असताना इगतपुरी नगरपालिकेच्या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात उभे आहेत. गेल्या २५ वर्षांपासून इगतपुरी पालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. भाजपा एकदाही सत्तेत आलेले नाही. सत्ताधाºयांकडून २५ वर्षांत शहराचा विकास न झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. फिरोज पठाण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. भाजपा विकासाच्या मुद्द्यावर रिंगणात उभी आहे. याचा भाजपाला मोठा फायदा होणार आहे. दरम्यान, सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या गोपनीय बैठका सुरू असून, राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. इगतपुरी नगर परिषदेवर शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. यंदाच्या निवडणुकीत युवकांनी पुढाकार घेतल्याने कित्येक वर्षांपासून सत्ता भोगणाºयाची मात्र झोपच उडाली आहे. कधी कोणाला स्वत:हून नमस्कार न करणारे आता गावातील गल्ली-बोळात पायी फिरताना रामराम करताना दिसू लागले आहेत.