शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरी दरोड्याचा उलगडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:59 IST

इगतपुरी तालुक्यातील एका हॉटेलचा मॅनेजर व महिला कामगार कारने घरी परतत असताना पारदेवी मंदिराच्या खिंडीजवळील रस्त्यावर दगड टाकून कार अडवून टाकण्यात आलेला दरोडा व मारहाणीचा नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या चोवीस तासांत उलगडा केला आहे़ या प्रकरणी इगतपुरी तालुक्यातील गिरणारे येथील सात संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सुमारे २५ हजारांचा ऐवजही जप्त करण्यात आला आहे़

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील एका हॉटेलचा मॅनेजर व महिला कामगार कारने घरी परतत असताना पारदेवी मंदिराच्या खिंडीजवळील रस्त्यावर दगड टाकून कार अडवून टाकण्यात आलेला दरोडा व मारहाणीचा नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या चोवीस तासांत उलगडा केला आहे़ या प्रकरणी इगतपुरी तालुक्यातील गिरणारे येथील सात संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सुमारे २५ हजारांचा ऐवजही जप्त करण्यात आला आहे़  मुंबईतील अल्पवयीन मुलींच्या अश्लील नृत्य प्रकरणी काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी छापा टाकलेले हॉटेल रेन फॉरेस्टचे मॅनेजर हुकूम धामे व दोन रिसेप्शनिस्ट महिला शुक्रवारी (दि़ २७) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास कामकाज आटोपून स्विफ्ट डिझायर कारने (एमएच १५, एफएफ ४७२४) इगतपुरीला जात होते़ पारदेवी मंदिराच्या खिंडीजवळील चढावर रस्त्यावर दगड आडवे लावून आठ ते दहा संशयितांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक करून काचा फोडल्या़ तसेच मॅनेजर धामे व महिलांना मारहाण करून त्यांच्याकडील पर्स, घड्याळ असा २ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला़ या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि़२८) दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला़  ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीन दुनगहू, आशिष अडसूळ, सहायक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ गुरुळे, रामभाऊ मुंढे, पोलीस हवालदार शिवाजी जुंदरे, बंडू ठाकरे, पोलीस शिपाई संदीप हांडगे, सचिन पिंगळ, सुशांत मरकड, हेमंत गिलबिले, संदीप लगड, प्रदीप बहिरम, चालक रानडे यांनी ही कामगिरी केली़माहितीवरून कारवाईदरोडेखोर आसपासच्या गावातीलच असल्याची पोलिसांची खात्री पटली होती.तसेच खबºयामार्फत मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी इगतपुरी तालुक्यातील गिरणारे येथील दीपक मच्छिंद्र लहाने (२७), प्रकाश मच्छिंद्र लहाने (२२) या दोघांना ताब्यात घेतले़ या दोघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी साथीदार सचिन काशीनाथ गिते (२२), मनोज अर्जुन डावखर (२२), विकास अर्जुन डावखर (२३), अमोल गोपाळ खारके (१९, सर्व रा. गिरणारे, ता़ इगतपुरी) व संतोष रामदास गिते (३२, रा़ तळोशी, ता़ इगतपुरी) यांच्यासोबत मिळून दरोडा टाकल्याची कबुली दिली़ पोलिसांनी या संशयितांकडून लुटून नेलेली पर्स व २४ हजार ३६० रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे़