शहरातील पेट्रोल-डिझेल डीलर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची पोलीस आयुक्तालयात सोमवारी (दि. २६) बैठक घेतली. या बैठकीत पेट्रोल विक्री करणाऱ्या व्यावसायिकांकडून विविध मुद्दे मांडण्यात आले. त्यांच्या मुद्द्यांवर पाण्डेय यांनी विश्लेषण करत शंकांचे निरसन केले. त्यानुसार १५ ऑगस्टपासून नाशिककरांना हेल्मेट असेल तरच पेट्रोलची खरेदी करता येईल, या पोलीस प्रशासनाच्या निर्णयावर पेट्रोल डीलर्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे एकमत झाले. या बैठकीप्रसंगी पोलीस उपायुक्त अमोल तांबे, साहाय्यक आयुक्त नवलनाथ तांबे, पेट्रोल-डिझेल डीलर्स संघटनेचे नितीन धात्रक, विजय ठाकरे, भूषण भोसले, सचिव सुदर्शन पाटील उपस्थित होते.
--इन्फो---
...आता तरी हेल्मेट शिरावर दिसेल का?
नाशिककरांनी हेल्मेटचा वापर करावा, यासाठी विविध प्रयोग आणि क्लृप्त्या यापूर्वीही लढविल्या गेल्या; मात्र तरीही बहुतांश नाशिककरांच्या अजूनही हेल्मेट फारसे अंगवळणी पडलेले नाही. हेल्मेट शिरावर कमी अन् दुचाकींच्या आरशांवर आणि पाठीमागे अडकविलेले अधिक पहावयास मिळते. त्यामुळे आता जेव्हा दुचाकी चालविण्यासाठी पेट्रोलच मिळणार नाही, म्हटल्यावर तरी हेल्मेट शिरावर घालण्यास नाशिककर प्राधान्य देतील का? हे लवकरच स्पष्ट होईल.