शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलाचे अनुदान इतरत्र वर्ग केल्यास फौजदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:55 IST

घरकुलासाठी मंजूर झालेले अनुदान संबंधित लाभार्थ्याच्या खात्यात जमा करण्याऐवजी परस्पर शेतकऱ्यांच्या पीककर्जात वर्ग केले जात असल्याचे प्रकार राज्यात इतरत्र घडलेले असतानाच असाच प्रकार कळवण येथेही उघडकीस आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे समजते.

नाशिक : घरकुलासाठी मंजूर झालेले अनुदान संबंधित लाभार्थ्याच्या खात्यात जमा करण्याऐवजी परस्पर शेतकऱ्यांच्या पीककर्जात वर्ग केले जात असल्याचे प्रकार राज्यात इतरत्र घडलेले असतानाच असाच प्रकार कळवण येथेही उघडकीस आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे समजते.  प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थींच्या घरकुलाच्या कामासाठी देण्यात येणारे अनुदान कोणत्याही बँकेने परस्पर पीककर्जात वर्ग केल्यास त्याच्याविरुद्ध फौजदारी कार्यवाही करण्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिला आहे. कळवण तालुक्यात असा प्रकार उघडकीस आला होता. दरम्यान, याबाबत गट विकास अधिकाºयाने संबंधित बँकेस याबाबत विचारणा केली असता सदर बँकेने वर्ग केलेले अनुदान तत्काळ लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची कार्यवाही सुरू केली असल्याचे सांगितले.  जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने ग्रामीण भागात घरकुल योजना राबविण्यात येते. याअंतर्गत शासनाकडून देण्यात येणारे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अदा करण्यात येते. मात्र कळवण तालुक्यातील एका बँकेने लाभार्थ्यांच्या पहिल्या व दुसºया हप्त्याच्या प्राप्त झालेल्या निधीतून २५ हजार रु पये पीककर्ज खात्यात परस्पर वर्ग केले होते.  रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार अशाप्रकारे लाभार्थ्यांच्या खात्यावरून शासकीय योजनेचे अनुदान वर्ग करता येत नाही. त्यामुळे अशाप्रकारे जिल्ह्णात बँका परस्पर अनुदान वर्ग करीत असतील तर ते नियमास धरून नाही. त्यामुळे अशाप्रकारे जिल्हाभरात कुठेही बँकेकडून लाभार्थींना शासकीय अनुदान पीक खात्यात वर्ग करण्यात येत असेल तर संबंधित बँकेच्या विरोधात फौजदारी कार्यवाही करणार असल्याचे डॉ. गिते यांनी म्हटले आहे.बॅँक वठणीवरदरम्यान, कळवण तालुक्यात एका बँकेत झालेल्या या प्रकाराबाबत कळवणचे गट विकास अधिकारी डी. एम. बहिरम यांनी सदर बँकेकडे याबाबत विचारणा केली असता बँकेने सदरचे अनुदान लाभार्थ्य्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येत असल्याचे सांगितले. सर्वसामान्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन ग्रामीण भागातील बॅँकांमध्ये असे प्रकार सर्रास सुरू असल्याचे बोलले जाते. सध्या फक्त एका बॅँकेबाबत तक्रार पुढे आली आहे. अशा कितीतरी बँकांनी योजनेची रक्कम परस्पर पीककर्जाचे वर्ग केली आहे. शेतपीकात अनुदान वर्ग करण्याचा प्रकार हा शासनाच्या डोळ्यात धूळफेक करणारा नसून जाणीवपूर्वक योजना आणि लाभांर्थीचा पैसा शेतीकर्जाची आकडेवारी फुगवणारा आहे. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी आता तातडीने अ‍ॅक्शन घेणार असल्याचे समजते.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद