शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांच्या समस्यांवर भावी वास्तुविशारदांच्या ‘आयडिया’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:24 IST

‘स्मार्ट सिटी’चे वेध लागलेल्या नाशिकमधील विविध चौक व रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत व सुरक्षित व्हावी, यासाठी रस्त्यांच्या समस्यांवर भावी वास्तुविशारदांनी ‘आयडिया’ सांगितल्या.

नाशिक : ‘स्मार्ट सिटी’चे वेध लागलेल्या नाशिकमधील विविध चौक व रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत व सुरक्षित व्हावी, यासाठी रस्त्यांच्या समस्यांवर भावी वास्तुविशारदांनी ‘आयडिया’ सांगितल्या.निमित्त होते, आयडिया महाविद्यालयाच्या वतीने गंगापूरोड वरील कुसुमाग्रज स्मारकात पार पडलेल्या चार दिवसीय ‘व्हर्टिकल स्टुडिओ’ या डिझाइन कार्यशाळेचे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत रस्त्यांच्या रचनेच्या माध्यमातून शहराच्या सौंदर्यामध्ये भर कशी टाकता येईल, याचाही विचार स्वतंत्ररीत्या क रत त्याचे सादरीकरण सभागृहात सादर केले. वाहतूक कोंडी, अवैधरीत्या बेशिस्तपणे उभी केलेली वाहने, अतिक्रमण, अयोग्य वाहतूक बेट त्यामुळे होणारी गैरसोय आदी समस्यांचे ग्रहण शहरातील रस्त्यांना लागले आहे. कॉलेजरोड, एमजीरोड, सराफ बाजार, मेनरोड, दहीपूल नाशिकरोडचा उड्डाणपुलासह अहल्यादेवी होळकर पूल, शहीद पूल आदिंचा अभ्यास यावेळी कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांनी केला. येथील समस्या कशा पद्धतीने सोडविता येतील आणि वाहतुकीला शिस्त कशी लावता येईल, या दृष्टिकोनातून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे संचालक विजय सोहनी, अधिष्ठाता विवेक पाटणकर यांचे मार्गदर्शन लाभले.