शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

दुर्मीळ वृक्ष उद्यानाची ओळख हरवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 01:10 IST

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे संतांच्या या ओळीप्रमाणे दुर्मीळ वृक्षांचे महत्त्व ओळखून वृक्ष मित्रमंडळाने या वृक्षाचे अनोखे उद्यान बापू बंगल्यासमोरील जागेत उभारले आहे. सुमारे १८ वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेले हे उद्यान आजही परिसरातील नागरिकांचे आकर्षण ठरत आहे. परंतु सुमारे एक वर्षापूर्वी त्यांची ओळख असणारे नावाचे चबुतरे हटवण्यात आल्याने त्यांची ओळखच हरवली आहे . त्यातच देखभालअभावी पालापाचोळा आणि गाजरगवताचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देमहापालिकेचे दुर्लक्ष : पालापाचोळा-गाजरगवताचे साम्राज्य, स्वच्छतेची मागणी

इंदिरानगर : वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे संतांच्या या ओळीप्रमाणे दुर्मीळ वृक्षांचे महत्त्व ओळखून वृक्ष मित्रमंडळाने या वृक्षाचे अनोखे उद्यान बापू बंगल्यासमोरील जागेत उभारले आहे. सुमारे १८ वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेले हे उद्यान आजही परिसरातील नागरिकांचे आकर्षण ठरत आहे. परंतु सुमारे एक वर्षापूर्वी त्यांची ओळख असणारे नावाचे चबुतरे हटवण्यात आल्याने त्यांची ओळखच हरवली आहे . त्यातच देखभालअभावी पालापाचोळा आणि गाजरगवताचे साम्राज्य निर्माण झाले आहे.उद्यानात विविध प्रकारचे औषधी वृक्ष या ठिकाणी लावण्यात आली असून, त्यांची ओळख व्हावी म्हणून परिसरातील निसर्गप्रेमी या ठिकाणी कुटुंबासह भेटी देत असतात वृक्षप्रेमी शा. प्र. दीक्षित व मोहन देवरे यांनी या वृक्षमित्रमंडळाची स्थापना केली. त्या काळी बापूबंगल्यासमोरील मोकळ्या जागेचा केरकचरा टाकण्यासाठीुदुरुपयोग होत असल्याने बकालस्वरूप प्राप्त झाले होते. मोकळ्या जागेचा दुरुपयोग थांबविण्यासाठी विविध औषध उपयोगी वृक्षांचे आणखी उद्यान साकारण्याचा संकल्प करण्यात आला. त्यासाठी सापुतारा ब्रह्मगिरी यांसारख्या विविध जंगले व डोंगरातून दुर्मीळ रोपे आणून लावण्यात आली. दहा वर्षांत उद्यानाचे संवर्धन करून त्याचे वृक्षात रूपांतर झाले. वृक्ष सावली देण्याबरोबरच त्यांच्या वैशिष्ट्यांची ओळख करून देत आहेत.उद्यानाच्या प्रत्येक वृक्षालगत चबुतरा बांधून त्यावर त्या वृक्षांची माहिती लिहिण्यात आली होती. त्यामुळे आबालवृद्धांना त्याची ओळख होत असे, परंतु त्यांची ओळख होणारे चबुतरे हटवण्यात आले. त्यांची ओळख नाहीशी झाली आहे. त्यातच सदर उद्यानाची देखभालअभावी गाजरगवत व पालापाचोळामुळे परिसरास बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे आबालवृद्धांनी आणि वृक्षप्रेमींनी उघानाकडे पाठ फिरवली आहे. तातडीने उद्यानाची कायमस्वरूपी स्वच्छता करावी, अशी मागणी वृक्षप्रेमींनी केली आहे.

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिका