शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

तपोवनातील स्थानिक रहिवाशांची ओळखपत्रासाठी तारांबळ

By admin | Updated: August 10, 2015 23:33 IST

यादीत नावे सापडेना : पोलीस चौकीसमोर गर्दी

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेकडून केल्या जाणाऱ्या कडेकोट बंदोबस्ताचा फटका तपोवन परिसरातील स्थानिक रहिवाशांना बसत आहे. ठिकठिकाणी उभारलेल्या बॅरिकेड्समधून या रहिवाशांच्या वाहनांना बाहेर जाण्याची परवानगी मिळावी म्हणून पोलीस यंत्रणेकडून ओळखपत्राचे वाटप करण्यात येत आहे; परंतु अनेक नागरिकांना अद्याप ओळखपत्र मिळाले नसल्याने त्यांची तारांबळ उडाली आहे.सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त तपोवन परिसरात साधुग्राममध्ये लाखोच्या संख्येने येणाऱ्या साधू आणि भाविकांमुळे पोलीस यंत्रणेकडून बंदोबस्तात दिवसेंदिवस वाढ करण्यात येत असल्याने या भागात राहणाऱ्या स्थानिक रहिवाशींची मात्र कोंडी झाली असून, त्यांना बाहेर फिरणेदेखील मुश्किल झाले आहे. ठिकठिकाणी लावण्यात येणाऱ्या बॅरिकेट्समुळे वाहने घेऊन जाणे अवघड झाले असून, यावर उपाययोजना म्हणून वाहनपास देण्यात येत आहेत. सदर वाहनपास तयार करण्यासाठी स्थानिक रहिवाशांकडून अर्ज भरून घेण्यात आले. परंतु रहिवाशांच्या संख्येपेक्षा जास्त अर्ज आल्याचे सांगत पोलीस यंत्रणेकडून त्याची छाननी करण्यात आली. या छाननीनंतर सुमारे १५०० रहिवाशांचे पास (वाहनपरवाना पत्र) तयार करण्यात आले. त्यापैकी ५०० स्थानिक रहिवाशांना तपोवन चौकातील पोलीस चौकीतून पासचे वाटप करण्यात आले. पास तयार झालेल्यांची यादी पोलीस चौकीबाहेर लावण्यात आली असून, ती पाहण्यासाठी झुंबड उडत आहे. काही लोकांची नावेच या यादीत नसल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. तसेच तपोवन परिसरातील अन्य ठिकाणी म्हणजे मळे भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांना बॅरिकेट लावल्यामुळे मोठा फेरा पडणार आहे. (प्रतिनिधी)