शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

बिनविरोध निवडीची आदर्श परंपरा तिसऱ्यांदा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 18:38 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यात आठ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून बहुतांश ठिकाणी निवडणुकीसाठी रंगत वाढण्याची चिन्हे आहेत. दरम्यान आठ ग्रामपंचायतींपैकी टिटोली ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे.

ठळक मुद्देहॅटट्रीक : इगतपुरी तालुक्यातील टिटोली ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध

घोटी : इगतपुरी तालुक्यात आठ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून बहुतांश ठिकाणी निवडणुकीसाठी रंगत वाढण्याची चिन्हे आहेत. दरम्यान आठ ग्रामपंचायतींपैकी टिटोली ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे. सात जागांसाठी बुधवारी (दि.३०) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी सात जागांसाठी सातच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याचे निश्चित झाले आहे. संपूर्ण टिटोली गावाने संघटित होऊन आदर्श निर्माण करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे या ग्रामपंचायतीची बिनविरोध निवडीची ही हॅटट्रिक आहे. तिसऱ्यांदा निवडणूक बिनविरोध होण्यासाठी ग्रामस्थांनी संघटितपणे पुढाकार घेतला. इगतपुरी तालुक्यात वर्षाच्या सुरुवातीलाच आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असल्याने त्या गावांत चुरस आहे. त्यात टिटोली गावाने आदर्श निर्माण करून बिनविरोध ग्रामपंचायत निवडीची हॅटट्रिक केली आहे. गेल्या १५ वर्षांपासून ही ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होत आली आहे. ही आदर्श परंपरा यावेळीही कायम ठेवण्यात येत असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण सात जागांसाठी सातच अर्ज दाखल झाले. प्रभाग क्र १ मधून अनुसूचित जमाती गटातून कोमल दशरथ हाडप तर ओबीसी स्त्री राखीव गटातून ज्योती बोंडे, प्रभाग क्र. २ मधून अनुसूचित जमाती गटातून भरत गभाले तर अनु. जमाती महिला राखीव गटातून लक्ष्मी गभाले तर प्रभाग क्र. ३ मधून सर्वसाधारण गटातून अनिल भोपे, अनु. जमाती महिला राखीव गटातून काजल गभाले तर सर्वसाधारण महिला राखीव गटातून माया भडांगे यांचे अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक