शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

आदर्श मतदान केंद्रे उभारणार

By admin | Updated: April 23, 2017 01:09 IST

मालेगाव : येथील महापालिकेची निवडणूक पारदर्शक होण्यासाठी यंत्रणेने पूर्ण तयारी केली असल्याची माहिती मनपा आयुक्त रवींद्र जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 मालेगाव : येथील महापालिकेची निवडणूक पारदर्शक होण्यासाठी यंत्रणेने पूर्ण तयारी केली आहे. निवडणूक काळातील प्रचार सभा, जाहिराती व इतर कामांच्या परवानग्यांसाठी स्वतंत्र खिडकी सुरू करण्यात येणार आहे. तसेच आचारसंहिता कक्ष कार्यान्वित केला जाणार आहे. आर्थिक घोडेबाजार रोखण्यासाठी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. शहरात हे पथक कार्यरत राहणार असल्याची माहिती मनपा आयुक्त रवींद्र जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.मालेगाव महापालिकेची येत्या २४ मे रोजी सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती आयुक्त जगताप यांनी पत्रकारांना दिली.जगताप पुढे म्हणाले की, येत्या सोमवारी दुपारी ४ वाजता शहरातील सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती दिली जाणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची ठिकाणे निश्चित करण्यात येणार आहेत. गरजू मतदारांना रुग्णवाहिका व शासकीय वाहन मतदानासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. मतदान केंद्रनिहाय यादी येत्या सोमवारी (दि. २४) प्रसिद्ध केली जाणार आहे. निवडणूक काळात होणाऱ्या सभा व प्रचाराच्या वाहनांसाठी लागणाऱ्या परवानग्या व इतर कामांसाठी संकीर्ण कर विभागात स्वतंत्र खिडकी सुरू केली जाणार आहे. निवडणूक काळात मतदारांना प्रलोभन म्हणून पैसे वाटप करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. यासाठी आयकर विभागाचे अधिकारी नियुक्त केले जाणार आहेत. स्वतंत्र पथके तैनात केली जाणार आहेत. (प्रतिनिधी)