शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी कमी होऊनही आइस्क्रीमचा थंडावा महागच

By admin | Updated: July 15, 2017 00:13 IST

आइस्क्रीमजीएसटी लागू होण्यापूर्वीच्याच दरांनी सध्या विक्री केली जात असून, कंपन्यांकडून दरांमध्ये बदल झाले तरच त्यात बदल केला जाणार असल्याचे डिस्ट्रिब्युटर व विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सरकारने जाहीर केलेल्या जीएसटीअंतर्गत आइस्क्रीम व संबंधित पदार्थांवरील कराचा बोजा कमी करण्यात आला असला आणि त्यामुळे आइस्क्रीमच्या किमती कमी होण्याची अपेक्षा असताना मूळ कंपन्यांनी आइस्क्रीमचे भाव जैसे थे च ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे आइस्क्रीमजीएसटी लागू होण्यापूर्वीच्याच दरांनी सध्या विक्री केली जात असून, कंपन्यांकडून दरांमध्ये बदल झाले तरच त्यात बदल केला जाणार असल्याचे डिस्ट्रिब्युटर व विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.  पूर्वी आइस्क्रीम व चॉकलेट आदी पदार्थांवर २८ टक्के कर होता. तो आता १८ टक्क्यांवर आला आहे. म्हणजे ८ टक्के कर कमी झाला आहे. स्वाभाविक आइस्क्रीमचे दर कमी व्हायला हवेत. परंतु अद्याप मूळ कंपन्यांनी कोणतेही बदल लागू केलेले नसून जीएसटीनंतर आइस्क्रीम उद्योगात दर बदल करणे, बिलिंग पद्धतीत बदल करणे या गोष्टी व्हायला आठवडा ते पंधरवडा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  वाढलेल्या जीएसटीचा फायदा कंपन्या स्वत:पुरताच सीमित ठेवून ग्राहकांना पूर्वीच्याच दरांनी सेवा देत फसवणूक करण्याची शक्यताही बोलून दाखविली जात आहे. कंपन्यांना होणाऱ्या फायद्यात ग्राहकांनाही सहभागी करून घ्यायला हवे तरच आइस्क्रीमचा गोडवा आणखी वाढला, असे म्हणता येईल.