शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

तोट्यात जाईन, पण एसटीच घेईन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 00:18 IST

संजय पाठक ।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : तोट्यात असलेली बससेवा महापालिकेच्या गळ्यात टाकण्यासाठी एसटी महामंडळ उत्सुक असताना महानगरपालिकेच्या मुखंडांची त्यादिशेनेच पावले वळू लागली आहेत. ‘तोट्यात जाईन, पण एसटी ताब्यात घेईनच’ अशी सध्या महापालिकेच्या काही प्रमुखांची तयारी असून, त्यासाठी पुन्हा एकदा बससेवेच्या व्यवहार्यता पडताळी अहवाल तयार करण्याठी सल्लागार संस्था नियुक्त करण्यात येणार ...

संजय पाठक ।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : तोट्यात असलेली बससेवा महापालिकेच्या गळ्यात टाकण्यासाठी एसटी महामंडळ उत्सुक असताना महानगरपालिकेच्या मुखंडांची त्यादिशेनेच पावले वळू लागली आहेत. ‘तोट्यात जाईन, पण एसटी ताब्यात घेईनच’ अशी सध्या महापालिकेच्या काही प्रमुखांची तयारी असून, त्यासाठी पुन्हा एकदा बससेवेच्या व्यवहार्यता पडताळी अहवाल तयार करण्याठी सल्लागार संस्था नियुक्त करण्यात येणार आहे. गेल्या महासभेत जादा विषयात सल्लागार संस्था नियुक्त करण्यास २५ लाख रुपयांच्या प्रशासकीय खर्चास मान्यता देण्यात आली आहे. शहर बस वाहतुकीची जबाबदारी ही महापालिकेची आहे किंवा नाही याबाबत वाद तर आहेच शिवाय महापालिकेच्या ऐच्छिक कर्तव्यांमध्ये त्याचा उल्लेख आहे. म्हणजेच तरीही महापालिकेत अनेकदा बससेवेचे प्रस्ताव आले आहेत. महापालिकेने आजवर नियुक्त केलेल्या विविध संस्थांनी शहरात चांगली बससेवा असावी याबाबत अहवाल दिला आहे, परंतु ती आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाही हेही तितकेच स्पष्ट करण्यात आले आहे. अलीकडेच बीआरटीएस शहरात चालणार नाही हेदेखील महापालिकेने नियुक्त केलेल्या एका संस्थेने स्पष्ट केले आहे.मुख्यमंत्र्यांची सूचना डावलणार?महापालिकेने बससेवा सुरू करण्याचा प्रस्ताव या आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महापालिकेच्या कामासंदर्भात राजीव गांधी भवनात झालेल्या बैठकीत मांडला होता. मात्र, एकूणच बससेवेचा विचार करता फडणवीस यांनी आता अशाप्रकारची जबाबदारी घेऊ नये, त्यापेक्षा अ‍ॅप टॅक्सींच्या धर्तीवर येऊ घातलेल्या अ‍ॅप बसचा विचार करावा, असा सल्ला दिला असल्याचे सांगण्यात येते. हे खरे असेल तर आता थेट मुख्यमंत्र्यांना डावलून बससेवेचा घाट घालणार काय, हा प्रश्न आहे.