शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मुखेड फाटा येथे रस्त्यावर भजन

By admin | Updated: June 6, 2017 02:27 IST

येवला : नाशिक-औरंगाबाद महामार्ग अडवून मुखेड फाटा येथे तासभर रास्ता रोको करत शेतकऱ्यांनी आंदोलन केले. महाराष्ट्र बंदला प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळण्यात आला.

 लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : नाशिक-औरंगाबाद महामार्ग अडवून मुखेड फाटा येथे तासभर रास्ता रोको करत शेतकऱ्यांनी आंदोलन केले. महाराष्ट्र बंदला प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळण्यात आला. मानोरी येथील वारकरी संप्रदायाच्या भजनी मंडळाने भजन म्हणत रस्त्यावर ठिय्या देत सरकारचा निषेध केला. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना अडवण्यात येऊन शेतमालाची वाहतूक होत नाही ना याची तपासणी करण्यात आली. यासाठी तरुण शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला होता. सोमवारी सकाळी साडेसात वाजता मुखेड फाट्यावर महामार्ग अडविण्यात आला. परिसरातील मुखेड, मुखेड फाटा, मानोरी, देशमाने, जऊळके, जळगाव नेऊर आदी गावांतील शेतकरी रस्त्यावर उतरल्याने गर्दी वाढत होती. जशी गर्दी वाढत होती तसा शेतकऱ्यांच्या भाषणांनी जोर धरला. त्यामुळे पोलीस यंत्रणा हतबल झाली होती. तब्बल तासाभरानंतर जमावाला पांगविण्यासाठी पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर व सहायक पोलीस उपनिरीक्षक तांदळकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस यंत्रणेने प्रयत्न केला.रास्ता रोको करण्यासाठी मुखेडला बाळासाहेब अहेर, भगवान जाधव, रवींद्र अहेर, कल्याणराव अहेर, सोमनाथ अहेर, दीपक मोगल, विजय अहेर, रवींद्र दराडे, विलास अहेर, महेश अनर्थे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात उतरले होते. येथे शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात येऊन शासनाचा निषेध करण्यात आला. रास्ता रोको आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर, दिनकर तिपायले, सदाभाऊ शेळके, शंकर चिने, योगेश गांगुर्डे, संजय जाचक, सौरभ तिपायले, सुरेश दुघड, आप्पासाहेब शेळके, बाबूराव शेळके, मच्छिंद्र वावधाने, राजू शेळके, संतोष अहेर, विलास शेळके, दिगंबर तिपायले, सुनील शेळके, राहुल शेळके, गोकुळ शेळके, विजू शेळके यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सामील झाले होते.