शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सराफ चौकशीबाबत हैदराबाद पोलिसांचे गूढ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:10 IST

देवीचौकातील सराफ व्यावसायिक राहुल शहाणे यांना गुन्ह्यातील चौकशीसाठी घेऊन जाणाºया हैदराबाद पोलिसांचा अद्याप उलगडा न झाल्याने हैदराबादी पोलिसांचे गूढ कायम आहे़ दरम्यान, याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकरोड : देवीचौकातील सराफ व्यावसायिक राहुल शहाणे यांना गुन्ह्यातील चौकशीसाठी घेऊन जाणाºया हैदराबाद पोलिसांचा अद्याप उलगडा न झाल्याने हैदराबादी पोलिसांचे गूढ कायम आहे़ दरम्यान, याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवीचौक सराफ बाजारातील धनश्री ज्वेलर्सचा संचालक राहुल बंडोपंत शहाणे या सराफी युवकाच्या मोबाइलवर शुक्रवारी (दि़२७) दुपारी फोन करून अज्ञात इसमांनी पांढºया रंगाच्या बोलेरो गाडी (एमएच १७ पूर्ण क्रमांक नाही) जवळ बोलविले. हैदराबाद पोलीस असल्याचे सांगत राहुल यास एका गुन्ह्यासंदर्भात चौकशीसाठी गाडीत बसवून नेले़ यानंतर राहुलच्या मोबाइलवरून सहायक पोलीस आयुक्तमोहन ठाकूर यांनाही हैदराबादचे पोलीस असून, राहुल शहाणे यास घेऊन जात असल्याचे सांगितले़ त्यांना नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्याबाबत सांगितले मात्र त्यांनी शहरापासून दूर आल्याचे सांगितले़  नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांना सदर घटनेची माहिती ठाकूर यांनी देताच ते देवीचौकात पोहोचले़ त्यांनी तेथील सराफी व्यावसायिकांकडून माहिती घेतल्यानंतर राहुल शहाणे यास बोलेरो गाडीत घेऊन गेल्याचे सांगितले़ मात्र, कायदेशीर तरतुदीनुसार स्थानिक पोलीस ठाण्यास माहिती देऊन नोंद केली नाही़ राहुलला घेऊन जाणारे नक्की पोलीसच आहेत का? याबाबत माहिती मिळत नसल्याने सराफ व्यावसायिक असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी चौकशी केली, मात्र पोलिसांकडे उत्तर नव्हते़ रात्री दहा वाजेनंतर पोलिसांनी राहुलच्या मोबाइलवर फोन केल्यानंतर हैदराबादला घेऊन जात असल्याची माहिती दिली़  नाशिकरोड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रूपेश काळे, पोलीस नाईक संदीप बागुल, राहुलचे नातेवाईक अशोक डहाळे, निवृत्ती मैंद हे खासगी वाहनाने रात्री ११ वाजता हैदराबादला रवाना झाले. मात्र शनिवारी (दि़२८) सायंकाळपर्यंत हे पथक राहुलला घेऊन हैदराबादला पोहोचलेले नव्हते तसेच त्यांच्याकडून कोणतीही माहिती दिली जात नसल्याने याप्रकरणाचे अद्यापही गूढ कायमच होते़ दरम्यान, तेलंगणा राज्यातील काझीपेठ रेल्वे पोलीस ठाण्यातील हे कर्मचारी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, काझीपेठ रेल्वे पोलीस ठाण्याचे मुख्यालय सिकंदराबाद असल्याने तेथे पथक पोहचल्यानंतरच उलगडा होईल, असे ढोकणे यांनी सांगितले.अपहरणाचा गुन्हा दाखलजेलरोड येथील संतोष राजाभाऊ डहाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्ह्याच्या तपासाच्या नावाखाली हैदराबाद पोलीस असल्याचे सांगून परस्पर सराफ राहुल शहाणे याला घेऊन जाणाºया इसमाविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याच्या तपासाच्या नावाखाली स्थानिक पोलिसांना माहिती न देता, विश्वासात न घेता झालेल्या प्रकारामुळे पहिल्यांदाच असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.