शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
3
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
4
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
5
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
6
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
7
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
8
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
9
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
10
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
11
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
12
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
13
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
14
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
15
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
16
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
17
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
18
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
19
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
20
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...

हुतात्मा भाई कोतवाल कार्यगौरव पुरस्कार वितरण

By admin | Updated: May 21, 2016 23:03 IST

नाभिक मेळावा : १२० समाजबांधवांचा सन्मान

नाशिक : नाभिक महामंडळातर्फे समाजाच्या एकत्रीकरणासाठी ‘नाभिक जोडो’ या उपक्रमांतर्गत आयोजित राज्यस्तरीय मेळाव्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १२० समाजबांधवांना हुतात्मा वीर भाई कोतवाल कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भाभानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात नाभिक समाजाच्या महामेळाव्याचे आमदार बाळासाहेब सानप यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी भगवान बिडवे होते. व्यासपीठावर दत्ता अनारसे, भिवंडी स्थायीचे सभापती प्रशांत लाड, नागपूरचे स्थायीचे सभापती बंडू राऊत, अंबादास पाटील, प्रभाकर लवांदे, दिलीप अनारसे, शशी अहिरे आदि प्रमुख पाहुणे व्यासपीठावर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सामाजिक, शैक्षणिक, कला, नाट्य, उद्योग, वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नाभिक समाजातील व्यक्तींचा हुतात्मा भाई कोतवाल कार्यगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. याप्रसंगी वृद्ध नाभिक व्यावसायिकास शासनातर्फे निवृत्तिवेतन मिळावे, आरोग्य सुविधा, गटई कामगार योजनेप्रमाणे व्यवसायासाठी टपऱ्या मिळाव्यात, तसेच नाभिक समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करावा, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी, समाजासाठी स्वतंत्र संत सेना महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी आदि मागण्यांचा प्रस्ताव यावेळी संमत करून त्यासंबंधी मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्याचा ठराव यावेळी करण्यात आला. दरम्यान, बाळासाहेब सानप यांनी नाभिक समाजासाठी महामंडळाची स्थापना करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. प्रास्ताविक भगवान बिडवे यांनी केले. मेधा पेठकर यांनी सूत्रसंचालन, तर अरुण सैंदाणे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)