शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

कवडासर येथील महिला सरपंचासह पतीचा खून

By admin | Updated: June 14, 2015 23:49 IST

कवडासर येथील महिला सरपंचासह पतीचा खून

दिंडोरी : तालुक्यातील कवडासर येथील वृद्ध महिला सरपंच व त्यांच्या पतीचा शेतातील घरात निर्घृण खून झाल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, अज्ञात मारेकऱ्यांनी तीक्ष्ण हत्त्याराने व दगडाने ठेचत सदर वृद्ध दांपत्याची क्रूर पद्धतीने हत्त्या केली आहे. हत्त्येचे कारण अद्याप समजू शकले नसून पोलीस सर्व शक्यता गृहीत धरत तपास करत आहेत.कवडासर येथील विद्यमान सरपंच सरूबाई जयराम गवळी (६५) व त्यांचे पती जयराम ढमा गवळी (७०) हे वृद्ध दांपत्य निचाईपाडा शिवारात वस्तीवर राहत होते. आज सकाळी निचाईपाडा येथील चौरंग पाडवी हा शेतात बैल बांधण्यासाठी गेला असता त्याला नाल्यात गवळी यांचा मृतदेह आढळून आला. त्याने घटनेची गावकऱ्यांना माहिती दिली. गावकायांनी ही घटना दिंडोरी पोलिसांना कळवली. सहायक पोलीस निरीक्षक भास्कर गणकवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत तपासकार्य सुरू केले; मात्र खुनाचे कारण समजू शकले नाही. हत्त्या कुणी व कशासाठी केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सदर दांपत्यास मूलबाळ नव्हते. त्यांनी बहिणीचा मुलगा पुंडलीक देवराम हिंडे यास दत्तक घेतले होते. तो गावात राहतो, तर जयराम गवळी हे भगतगिरी करत असल्याची चर्चा आहे. मयत महिलेचे सोन्याचे दागिने गायब असून, चोरीच्या कारणास्तव खून झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र पोलिसांनी यास दुजोरा न देत सर्व शक्यता पडताळून पाहत तपास सुरू केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत तपासाच्या सूचना दिल्या असून, पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भास्कर गणकवार, हवालदार गवळी अधिक तपास करीत आहेत.