शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पतीनेच केली पत्नीची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 00:33 IST

इंदिरानगर : नातेवाइकांविरुद्ध गुन्हा दाखल; दीड लाख रुपये घेतलेइंदिरानगर : स्वत:च्या पत्नीचा परपुरुषाबरोबर विवाह लावून त्याबदल्यात सुमारे दीड लाख रुपये घेऊन पत्नीची विक्री केल्याचा प्रकार इंदिरानगरमध्ये उघडकीस आला आहे़ विशेष म्हणजे विवाहापूर्वी संबंधित वराला वधू ही आपली पत्नी असल्याचे लपवून ठेवत बळजबरीने विवाह लावून दिला. या कृत्यास पती अमोल भालेराव याची आई, बहीण व तिच्या मित्रांविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

इंदिरानगर : नातेवाइकांविरुद्ध गुन्हा दाखल; दीड लाख रुपये घेतलेइंदिरानगर : स्वत:च्या पत्नीचा परपुरुषाबरोबर विवाह लावून त्याबदल्यात सुमारे दीड लाख रुपये घेऊन पत्नीची विक्री केल्याचा प्रकार इंदिरानगरमध्ये उघडकीस आला आहे़ विशेष म्हणजे विवाहापूर्वी संबंधित वराला वधू ही आपली पत्नी असल्याचे लपवून ठेवत बळजबरीने विवाह लावून दिला. या कृत्यास पती अमोल भालेराव याची आई, बहीण व तिच्या मित्रांविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंदिरानगरमधील महिलेचे अमोल भालेराव याच्यासोबत विवाह झालेला होता़ मात्र, कोणताही कामधंदा न करणाºया भालेराव यास पत्नीने अनेकदा कामाबाबत सूचनाही केली़ पती अमोल भालेराव हा पत्नीस सुरतहून म्हैसाना येथे घेऊन गेला.तिथे तिची सासू ललिता भालेराव, नणंद मयूरी हरीश उघाडेसह मयुरीचा मित्र नितीन सारवान, मेघा सोलंकी व गोपाळ सोलंकी, प्रिया व तिचा नवरा नागेश हे सर्व भेटले. यानंतर ते राजस्थानमधील पाली येथील जैन भवनात गेले़पाली येथील जैन भवनमध्ये विशाल जैन व त्यांच्या कुटुंबीयांना अमोल भालेराव याने पत्नीला विवाहासाठी दाखविण्याचा कार्यक्रम केला़ यावेळी सासूने मावशी, पतीने भाऊ व नणंद मयूरी हिने बहीण असल्याचे विशाल जैन यांना सांगून दुसºया दिवशी त्यांच्याशी विवाह लावून दिला़विवाहानंतर अमोल भालेरावच्या पत्नीने जैन यांना आपले लग्न झालेले असल्याचे सांगताच जैन याने अमोल भालेराव यास एक लाख ६० हजार रुपये दिले असल्याचे सांगितले़ यानंतर जैन यांनी मनमाड येथील विवाहितेच्या वडिलांशी संपर्क साधला होता.व्यावसायिक अडचणीमुळे जैन यांनी विवाहितेस नाशिकला सोडू शकत नसल्याचे सांगितले़ त्यामुळे दोन दिवसांपूर्वीच जैन यांना कोतवाली पोलीस ठाण्यात बोलावले असता त्याठिकाणी विवाहितेचा भाऊ राष्ट्रपाल पगारे व धम्मरत्न पाटील हे नाशिक पोलिसांसह दाखल झाले होते़ यानंतर विवाहितेस नाशिकला आणले असता तिने इंदिरानगर पोलीस ठाण्यात पती अमोल भालेराव, ललिता भालेराव, मयूरी भालेराव, नितीन सारवान, मेघा सोलंकी, गोपाळ सोळंकी यांच्याविरोधात विक्री केल्याची फिर्याद दिली़