सुरगाणा : चारित्र्याच्या संशयावरून पती पत्नी मधील वाद विकोपाला जाऊन यात पतीने लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून पत्नीची हत्त्या केल्याची घटना घडली तालुक्यातील आमझर येथे घडली. घटने नंतर पती पसार झाला आहे.शेवंती वसंत पवार (36) असे हत्या झालेल्या मिहलेचे नाव असून मयत शेवंती यांचा भाऊ गोविंद कुवर यांनी पोलीसात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की मंगळवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास बिहणीचे पती वसंत जानक पवार (40) यांनी चारित्र्याच्या संशयावरून मनात राग धरून वाद केला. यावेळी पती वसंत यांनी लाकडी दांडक्याने पत्नी शेवंतीच्या डोक्यात, पाठीवर, हाता तोंडावर जबर मारहाण करून हत्या केली आहे.पत्नीच्या हत्येनंतर पती वसंत पळून गेला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सदानंद वाघमारे, पोलीस निरीक्षक दिवानिसंग वसावे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पत्नीची हत्त्या करून पळून गेलेल्या पतीचा शोध पोलीस घेत आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर नांद्रे हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करित आहेत.
पतीने केली पत्नीची हत्त्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 01:11 IST
सुरगाणा : चारित्र्याच्या संशयावरून पती पत्नी मधील वाद विकोपाला जाऊन यात पतीने लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून पत्नीची हत्त्या केल्याची घटना घडली तालुक्यातील आमझर येथे घडली. घटने नंतर पती पसार झाला आहे.
पतीने केली पत्नीची हत्त्या
ठळक मुद्देदांडक्याने पत्नी शेवंतीच्या डोक्यात, पाठीवर, हाता तोंडावर जबर मारहाण करून हत्या केली आहे.