शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पतीने पत्नीला जाळून ठार मारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 01:11 IST

नाशिक : गंगापूररोडवरील ध्रुवनगर परिसरात एका गृहप्रकल्पाच्या साईटवर देखरेखीसाठी परप्रांतीय शाह दाम्पत्य राहात होते. संशयित पती समशेर अबलोश शाह याने पत्नी आयशा खातून शाह हिला मध्यरात्री ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून पेटवून दिले. यात शंभर टक्के भाजल्याने आयशाचा मृत्यू झाला तर संशयित पती समशेरदेखील भाजला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ठळक मुद्देध्रुवनगर : संशयित आरोपीही भाजला

नाशिक : गंगापूररोडवरील ध्रुवनगर परिसरात एका गृहप्रकल्पाच्या साईटवर देखरेखीसाठी परप्रांतीय शाह दाम्पत्य राहात होते. संशयित पती समशेर अबलोश शाह याने पत्नी आयशा खातून शाह हिला मध्यरात्री ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून पेटवून दिले. यात शंभर टक्के भाजल्याने आयशाचा मृत्यू झाला तर संशयित पती समशेरदेखील भाजला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.ध्रुवनगर परिसरातील मराठी शाळेजवळील एका बांधकाम व्यावसायिकाच्या गृहप्रकल्पावर वॉचमन म्हणून सदनिकेत राहणाऱ्या शाह कुटुंबीय मूळ बिहार राज्यातील आहे. समशेर व आयशा या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वादविवाद झाले. मंगळवारी (दि.१२) मध्यरात्रीच्या सुमारास समशेर याने पत्नीच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळून मारले. दरम्यान, आगीची झळ बसल्याने संशयित समशेर काही प्रमाणात भाजल्याने त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गृहप्रकल्पाच्या ठेकेदाराने भिवंडी येथून या कुटुंबीयाला वॉचमन म्हणून कामावर ठेवले होते.दरम्यान, एका वाटसरूने मंगळवारी रात्री ध्रुवनगर परिसरात वॉचमनच्या खोलीला आग लागल्याची माहिती गंगापूर पोलिसांना कळविली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले असता त्यांनी तत्काळ विजेरीच्या प्रकाशात खोलीत जाण्याचा प्रयत्न केला असता प्रचंड धूर येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.पतीने पत्नीलाजाळून ठार मारले(पान १ वरून)त्यावेळी समशेर याची पत्नी आयशा पूर्णपणे भाजून मृत्युमुखी पडल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यावेळी समशेर हा खोलीमध्ये आगीच्या ज्वालांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी इतरत्र पळत होता. पोलिसांनी तत्काळ त्याला सुरक्षित बाहेर काढून ताब्यात घेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याबाबत पोलिसांनी सखोल तपास केला असता कु ठल्याही प्रकारची आग घरामध्ये लागलेली नव्हती तर मयत आयशाचा पती संशयित समशेर याने ज्वलनशील पदार्थाच्या सहाय्याने पत्नीला जाळून ठार मारल्याचे उघडकीस आले आहे.या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात दत्तात्रय लहानू माळी (५५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात संशयित समशेरविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक मोरे करीत आहेत.