शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अडथळ्यांच्या शर्यती, परवाने अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:28 IST

शेतकºयांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या खते, बियाणे व कीटकनाशके कृषी निविष्ठांची दुकान्यांचे परवाने मिळविण्यासाठी नवनवीन कायदे तयार होत आहेत. कीटकनाशके विक्रीचा परवाना दोन वर्षे, तर बी-बियाणे विक्रीचा परवाना तीन वर्षांसाठी दिला जातो. त्यासाठी दरवर्षी नूतनीकरण आवश्यक असते. कीटकनाशके विक्रेत्यांना नूतनीकरणाची गरज नसली तरी परवान्यासाठीच्या अटी जाचक आहेत.

गणेश धुरी।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकºयांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या खते, बियाणे व कीटकनाशके कृषी निविष्ठांची दुकान्यांचे परवाने मिळविण्यासाठी नवनवीन कायदे तयार होत आहेत. कीटकनाशके विक्रीचा परवाना दोन वर्षे, तर बी-बियाणे विक्रीचा परवाना तीन वर्षांसाठी दिला जातो. त्यासाठी दरवर्षी नूतनीकरण आवश्यक असते. कीटकनाशके विक्रेत्यांना नूतनीकरणाची गरज नसली तरी परवान्यासाठीच्या अटी जाचक आहेत. काही दिवसांपूर्वीच घोटी (ता. इगतपुरी) येथे खतेविक्रीच्या परवान्याच्या जागी चक्क मद्यविक्री सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला. या दुकानावर तीन महिन्यांसाठी खते विक्रीचा परवाना निलंबित करण्यात आला असला तरी त्या अनुषंगाने एकूणच खतांच्या परवाने व नूतनीकरणाच्या आडून चालणारे गोरखधंदे उघड झाले. काही बोटावर मोजण्याइतक्या बदमाशी करणाºया लोकांमुळे सरसकट सर्वच खते व बियाणे विक्रेत्यांकडे संशयाने पाहिले जात आहे. वास्तविक पाहता हे दुकाने गावातल्या गावात शेतकºयांना त्यांच्या खरीप आणि रब्बी हंगामासाठी आवश्यक ती बी-बियाणे आणि खते उपलब्ध करून देत असतात. त्यासाठीच्या अटी-शर्ती पाहिल्या तर सहजपणे कोणालाही कृषी निविष्ठा विक्रीचा परवाना मिळेलच याची शाश्वती नाही. मात्र अनेक दिव्यातून तावूनसुलाखून परवाना मिळविलेल्या परवानाधारकांनीही मिळालेल्या परवान्यानुसारच शासनाचे नियम-निकष पाळून कृषी निविष्ठांची विक्री केली पाहिजे. कृषी निविष्ठांसाठी असलेल्या जाचक अटींमुळे सर्व सामान्य शेतकरी अथवा एखादा पदवीधारक सुशिक्षित बेरोजगार युवकाने स्वत:चाच व्यवसाय सुरू करण्यासाठी कृषी निविष्ठा परवाना काढायचे ठरविल्यास त्यासाठी ती तारेवरची कसरत असते.  कीटकनाशके विक्रीच्या परवान्यासाठी स्वतंत्र दुकान व स्वतंत्र गुदामासाठी जागा आवश्यक असणे बंधनकारक आहे. तसेच कीटकनाशक विक्रीचा परवाना ज्याच्या नावावर घ्यायचा आहे, तो पदवी किंवा पदविकाधारक असण्याची अट आहे. म्हणजेच प्रत्येकालाच पदवी, पदविका मिळवूनच परवाना काढावा लागेल. प्रत्येकाकडेच ती जागा उपलब्ध होईल, असे नाही. सातबारा काढण्यापासून ते कृषी निविष्ठा परवाना काढण्यापर्यंत अनेक अडचणींचा डोंगर पार करावा लागतो. हा अडचणींचा डोंगर पार केलाच तरीही शुल्लक कारणांनी परवाना निलंबनाची टांगती तलवार कृषी निविष्ठाधारकांवर कायम असते. भरारी पथकांची पाहणी आणि तपासणीही बºयाच वेळा कृषी निविष्ठाधारकांची डोकेदुखी वाढविणारी असते. बºयाच वेळा आॅनलाइन अर्ज करूनही कृषी निविष्ठा परवाना मिळविण्यासाठी जिल्हा परिषदेत चकरा माराव्या लागतात.