शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती व्यवस्थापन परिषदेसाठी स्पॉन्सरची शोधाशोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 01:20 IST

पुढच्या वर्षी मुंबईत होणाऱ्या जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषदेसाठी जगभरातील संशोधक, शास्त्रज्ञ दाखल होणार असून, त्यासाठी येणाºया कोट्यवधी रुपयांच्या खर्चासाठी राज्य सरकारला स्पॉन्सर शोधण्याची वेळ आली आहे. या परिषदेत सहभागी होऊ इच्छिणाºयांना अडीच ते पंचवीस लाखांपर्यंतची मदत करता येणार असून, त्यामोबदल्यात संबंधितांवर राज्य सरकार सोयी-सवलतींचा वर्षाव करणार आहेत. त्याचाच भाग म्हणून गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील मोठ्या कारखानदारांची बैठक घेऊन त्यांना साकडे घालण्यात आले आहे.

ठळक मुद्देउद्योजकांना साकडे : खर्च भागविण्यासाठी राज्यातून गोळा करणार पैसे

नाशिक : पुढच्या वर्षी मुंबईत होणाऱ्या जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषदेसाठी जगभरातील संशोधक, शास्त्रज्ञ दाखल होणार असून, त्यासाठी येणाºया कोट्यवधी रुपयांच्या खर्चासाठी राज्य सरकारला स्पॉन्सर शोधण्याची वेळ आली आहे. या परिषदेत सहभागी होऊ इच्छिणाºयांना अडीच ते पंचवीस लाखांपर्यंतची मदत करता येणार असून, त्यामोबदल्यात संबंधितांवर राज्य सरकार सोयी-सवलतींचा वर्षाव करणार आहेत. त्याचाच भाग म्हणून गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील मोठ्या कारखानदारांची बैठक घेऊन त्यांना साकडे घालण्यात आले आहे.२९ जानेवारी ते ३ फेब्रुवारीदरम्यान चालणाºया जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषदेची चौथी परिषद भरविण्याचा भारताला व त्यातल्या त्यात महाराष्टÑाला मान मिळालेला असून, मुंबईत होणाºया या परिषदेत प्रामुख्याने आजवर जगात आपत्तीच्या घडलेल्या घटनांचा अभ्यास करून अशा घटनांना प्रतिबंध, त्यापासून बचाव, त्याला सामोरे जाण्यासाठी करावी लागणारी तयारी याचा विस्तृत ऊहापोह केला जाणार आहे. जगातील मोठे शास्त्रज्ञ, विविध विषयाचा सखोल अभ्यास केलेले संशोधक या परिषदेत सहभागी होणार आहेत. त्यासाठी प्रदर्शन, चर्चासत्रे व व्याख्यानांचे आयोजन करण्यात येणार असून, या परिषदेत सहभागी होण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाविषयी आत्मीयता असणाºया प्रत्येक तालुक्याच्या एकेक प्रतिनिधीला सहभागी करून घेतले जाणार आहे. साधारणत: अडीच लाख ते पंचवीस लाखांपर्यंतची मदतीची स्पॉन्सरशिप उद्योजक, देणगीदार घेऊ शकतील. त्यासाठी त्यांच्यासह बारा प्रतिनिधींची चार दिवस मोफत परिषदेत राहण्याची तसेच खाण्या-पिण्याची व्यवस्था, परिषदेच्या प्रदर्शनात स्टॉलसाठी जागा, जाहिरातीसाठी फलक स्टॅण्ड आदी सोयी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.या परिषदेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्यासाठी महिंद्रा, मायको यांसारख्या मोठ्या कंपन्यांच्या व्यवस्थापनाला पाचारण करण्यात येऊन त्यांना स्पॉन्सरशिपसाठी गळ घालण्यात आली. स्पॉन्सरशिपची रक्कम थेट राज्य सरकारच्या खात्यात जमा करण्याची सुविधा असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.प्रत्येक जिल्ह्याला या परिषदेत सहभागी होऊन विविध प्रकारच्या आपत्तीवर मात करण्यासाठी घ्यावयाची खबदारी व प्रत्यक्ष आलेला अनुभव याचे सादरीकरणाची संधीही दिली जाणार असून, असे सादरीकरण करण्यासाठी येणाºया खर्चाची राज्य सरकारने तजवीज केलेली नाही, त्यासाठी त्या त्या जिल्ह्यांनी स्पॉन्सरचा शोध घेऊन त्यांच्याकडून आर्थिक मदत घेण्याची मुभा दिली आहे.

टॅग्स :NashikनाशिकEconomyअर्थव्यवस्था