शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

रेंडाळे येथे हरणाची कुत्र्यांकडून शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 14:24 IST

येवला : तालुक्यातील रेंडाळे येथे नगरसूल रस्त्यावर पिरबाबाच्या मंदिराजवळ पाण्याच्या शोधात असलेल्या हरणाची कुत्र्यांनी लचके तोडून शिकार केली असून हा प्रकार रेंडाळे येथील अमोल अहेर या शालेय विद्यार्थ्याच्या निदर्शनास आज सकाळी आला. दिवसेंदिवस कुत्र्यांकडून हरणाची शिकार होण्याचे प्रकार वाढू लागले आहे. सध्या परिसरात भीषण पाणी टंचाई असल्याने पाण्याच्या शोधार्थ हरणाचे ...

येवला : तालुक्यातील रेंडाळे येथे नगरसूल रस्त्यावर पिरबाबाच्या मंदिराजवळ पाण्याच्या शोधात असलेल्या हरणाची कुत्र्यांनी लचके तोडून शिकार केली असून हा प्रकार रेंडाळे येथील अमोल अहेर या शालेय विद्यार्थ्याच्या निदर्शनास आज सकाळी आला. दिवसेंदिवस कुत्र्यांकडून हरणाची शिकार होण्याचे प्रकार वाढू लागले आहे. सध्या परिसरात भीषण पाणी टंचाई असल्याने पाण्याच्या शोधार्थ हरणाचे कळप मानवी वस्त्यांकडे धाव घेत आहे. त्यातच तालुक्याच्या उत्तर- पुर्व भागात सततचा दुष्काळ आणि भीषण पाणी टंचाई पाचवीलाच पुजलेली असते. या भागात जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापासूनच टँकरने पाणी पुरवले जाते. अशात वन्यजिवांना पाणी मिळणे दुरापास्त होते. या भागात हरीण आणि मोर हे जास्त प्रमाणात आढळतात. उन्हाळ्याच्या शेवटच्या काही दिवसात बऱ्याच मुक्या वन्य प्राण्यांना पाण्या अभावी प्राण गमवावे लागतात. लचके तोडलेले हरिण पिरबाबाच्या मंदिराजवळ दिसल्यानंतर ग्रामस्थांनी हा प्रकार वन्यजीव संरक्षक समिती सदस्य प्रविण आहेर यांना कळविले. आहेर यांनी ही बाब वनपरिक्षेत्र अधिकारी भंडारी, वनपाल अशोक काळे, वनसंरक्षक ज्ञानेश्वर वाघ यांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, अजुनही घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी भेट दिलेली नाही. मृत हरिणाचे कुत्र्यांनी पुन्हा लचके तोडल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे. रेंडाळे हे ममदापूर वनसंवर्धन राखीव क्षेत्रात येते. मात्र, वन्यजिवांच्या सुरक्षेची हमी देण्यास वनखाते टाळाळ करते. वनविभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :Nashikनाशिक