शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
3
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
4
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
5
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
6
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
7
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
8
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
9
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
10
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
11
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
12
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
13
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
14
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
15
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
16
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
17
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
18
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
19
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
20
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष

मालेगावी विविध संघटनांचे उपोषण आंदोलन

By admin | Updated: March 23, 2017 23:15 IST

मालेगाव : येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ शहरातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी लाक्षणिक उपोषण व घंटानाद आंदोलन छेडले होते.

मालेगाव : शहरातील मुख्य गणेशकुंड व पुरातन महादेव मंदिरालगतचा भूखंड व्हॉलीबॉल क्लबला देण्याचा मनपाचा ठराव तातडीने विखंडित करावा, या मागणीसाठी महादेव सेवा समितीसह हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ शहरातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी लाक्षणिक उपोषण व घंटानाद आंदोलन छेडले होते. यावेळी प्रांताधिकारी अजय मोरे व मनपा उपआयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. दरम्यान, कायदेशीर बाबी तपासून कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन मनपा उपआयुक्त डॉ. पठारे यांनी दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. मालेगाव महापालिकेच्या महासभेत महापौरांच्या यादीनुसार सर्व्हे क्रमांक ५४८ व सर्व्हे क्रमांक ५४९ परिसरातील भुखंडाला शहीद हेमंत करकरे यांचे नाव देऊन व्हॉलीबॉल क्लबला देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. या वादग्रस्त ठरावावरुन महासभेत गदारोळ देखील झाला होता. तसेच महादेव सेवा समिती, नागरी सुविधा समिती, आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती, मध्यवर्ती गणेशोत्सव समिती, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सदरचा भुखंड क्लबला देण्यास तीव्र विरोध दर्शविला होता. तसेच सदरचा विषय नस्तीबंद करण्यात आला होता. मात्र गेल्या आठवड्यात झालेल्या महासभेत सदरचा विषय मंजुर करण्यात आला. यामुळे महादेव सेवा समितीसह हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. गणेशकुंड परिसरातील भुखंड मोकळा राहू द्यावा तसेच सदरचा ठराव विखंडीत करावा या मागणीसाठी येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी लाक्षणीक उपोषण आंदोलन छेडले होते. दरम्यान उपायुक्त प्रदीप पठारे, सहाय्यक आयुक्त विलास गोसावी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन याबाबत कायदेशीर बाबी तपासून कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. या आंदोलनात ंमहादेव सेवा समितीचे अध्यक्ष पंकज मुंदडा, सेक्रेटरी विवेक वारुळे, प्रवीण बच्छाव, राजेश वाचपेयी, कृष्णा पाटील, सचिन जाधव, महादु मंडाळे, ेखेमचंद गाभु, हेमंत चौधरी, कैलास सोनवणे, राजू इंगळे, आकाश श्रीवास्तव, दादा बहिरम, भाग्येश कासार, यशवंत खैरनार, सुनील चव्हाण, रामदास बोरसे, देवा पाटील, हरिष मारु, निखिल पवार, राहूल देवरे, जयराज बच्छाव, जयवंत माळी आदिंसह विविध संघटनांचे पदाधिकारी, सदस्य सहभागी झाले होते.शिवसेना पदाधिकारी व नगरसेवकांनी घेतली आयुक्तांची भेट गणेशकुंड परिसरातील भुखंड व्हॉलीबॉल क्लबला देण्याचा ठराव विखंडीत करुन खोटा ठराव करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेचे पदाधिकारी व नगरसेवकांनी मनपा उपायुक्त प्रदिप पठारे यांची भेट घेऊन केली आहे. महानगरपालिकेच्या महासभेत ठराव क्रमांक १९८ हा मंजुर करण्यात आला. सदरचा विषय संवेदनशील आहे. शहर शांततेला बाधा पोहचविणारा आहे. भुखंडालगत पुरातन महादेव मंदिर व गणेश विसर्जन कुंड तसेच गणेश विसर्जन मिरवणुकीचा मार्ग आहे. त्यामुळे भविष्यात वाद होण्याची शक्यता आहे. सदरची बाब लक्षात घेऊन मनपाने वादग्रस्त ठराव विखंडीत करावा अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक अ‍ॅड. संजय दुसाने, तानाजी देशमुख, प्रमोद शुक्ला, कैलास तिसगे, भारत म्हसदे, मनोहर बच्छाव, भरत पाटील, संगिता चव्हाण, मिनाताई काकळीज, सुमित्रा म्हसदे, ताईबाई म्हसदे, रेखा येशीकर, विजया काळे, ज्योती सुराणा आदिंनी केली आहे. (प्रतिनिधी)