शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

नांदगावी जंगलाला लागलेल्या भीषण आगीत शेकडोे वृक्ष खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:12 IST

दरम्यान, आगीचे वृत्त कळताच शहराच्या विविध भागातून निसर्गप्रेमी नांदगावकर मिळेल त्या वाहनांनी घटनास्थळी धावले. मालेगाव रस्त्यालगत डोंगराजवळ २० ...

दरम्यान, आगीचे वृत्त कळताच शहराच्या विविध भागातून निसर्गप्रेमी नांदगावकर मिळेल त्या वाहनांनी घटनास्थळी धावले. मालेगाव रस्त्यालगत डोंगराजवळ २० हेक्टर क्षेत्रात आठ वर्षांपूर्वी वनविभागाने लावलेल्या जंगलात आज ३,००० पेक्षा अधिक संख्येने झाडे होती. जंगलात वाळलेले गवत आहे. त्यातून उठलेल्या ज्वाळा अल्पावधीत २५ ते ३० फूट उंचीपर्यंत पोहोचल्या आणि वायूच्या वेगाने ही आग संपूर्ण क्षेत्रावर पसरली.

वाऱ्यासोबत धावणाऱ्या आगीत घुसून निसर्गप्रेंमींनी, पोलीस, वनविभागाचे कर्मचारी अधिकारी आदींनी आग विझविण्यासाठी मदत केली. मिनिटागणिक पसरणाऱ्या आगीला थांबविण्यासाठी शेकडो हात सरसावले. हातात हिरव्या पाल्याच्या फांद्या घेऊन त्याचे फटके मारून आगीशी सामना केला. १० हेक्टर जंगल जळून खाक झाले.

-------------------------

नगरपरिषदेचे अग्निशमन वाहन बंदच

जंगलाच्या दक्षिण दिशेला, तार कंपाउडच्या कडेला बसून मद्य पिऊन झिंगाट झालेल्या बेजबाबदार व्यक्तींकडे संशयाची सुई वळली असून, वनविभागाने या घटनेचा शोध लावण्यासाठी तातडीने पावले उचलावी, अशी मागणी करण्यात येत आहे. निंब, सौंदड, बोर, खैर, हिवर, बाभूळ, शिसम, चमेली, हरणदोडी, फापडा, अंजन, सीताफळ, रामफळ आदींसह विविध जातींची वृक्षसंपदा आगीत जळाली. लाखो रुपये खर्चून घेतलेली नांदगांव नगरपरिषदेची अग्निशमन दलाची गाडी गत सात वर्षांपासून चालकाविना बंद आहे. याचे स्मरण सर्वांना झाले.

नांदगांव वनविभाग, पोलीस दल, गृहरक्षक, जनसेवा मंडळ, श्रीरामनगर ग्रामस्थ, पोलीस निरीक्षक अनिल काकडे, चंद्रशेखर कवडे, नानू कवडे, अमोल कोठावदे, दीक्षित बंधू, अमोल निकम मित्रमंडळ, अमोल खैरनार मित्रमंडळ, राऊत बंधू, सोनज बंधू, जनार्दननगर, श्रीरामनगर, कोकणवाडा, खैरनार वस्ती, बँक काँलनी, शिवस्फूर्ती भागातील नागरिकांनी मदत केली. वनअधिकारी डी.डी. बोरसे, सूर्यवंशी आदींनी सहकार्य केले. (०१ नांदगाव १/२)

===Photopath===

010121\01nsk_4_01012021_13.jpg

===Caption===

०१ नांदगाव २