शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो इच्छुकांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द !

By admin | Updated: February 4, 2017 01:32 IST

सर्वपक्षीयांची क्लृप्ती : नाराजांची अखेर बोळवण

 नाशिक : महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपात वाढलेल्या इच्छुकांच्या नाराजीला आवर घालण्यासाठी दोन्ही पक्षांच्या वतीने अनेक प्रयत्न करण्यात आले. महापालिकेच्या स्वीकृत सदस्यपदापासून अन्य अनेक पदांचे आमिष देण्यात आले. तथापि, नाराजी कमी झाली नाही उलट महापालिका निवडणुकीत त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांमध्ये चुरस असली तरी शिवसेना आणि भाजपाकडे इच्छुकांची अधिक संख्या होती. भाजपाकडे सातशेहून अधिक, तर शिवसेनेकडे आठशेहून अधिक इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. त्यानुसार उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. तथापि, सर्वच पक्षांकडे इच्छुकांची दावेदारी इतकी प्रबळ होती की, प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने नेत्यांच्या, समाजाच्या माध्यमातून दबाव आणत होते. अखेरीस अशा नाराजांना स्वीकृतचा शब्द देण्यात आला आहे. नेत्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवणे कठीण असले तरी केवळ नेत्यांचा शब्द म्हणून अनेकांनी दावेदारी मागे घेतली आणि पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून देण्याची तयारी दर्शविली. मिळालेल्या माहितीनुसार भाजपाच्या वतीने अशाप्रकारे वेगवेगळ्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना स्वीकृत सदस्यपदाचा शब्द दिला आहे. शिवसेनेतही अशाच प्रकारे अनेकांना राजी करण्यासाठी स्वीकृत सदस्यपदासह वेगवेगळे शब्द दिले जात आहे.