शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

शेकडो हेक्टर जमिनीचे झाले कुरण!

By admin | Updated: February 16, 2016 23:06 IST

विकासाला खीळ : जिल्हा प्रशासनासह राजकीय अनास्थेचा फटका

 

योगेश सगर कसबे सुकेणेजिल्ह्यात कसबे सुकेणे ते ओझर या बंद रेल्वेमार्गाची जमीन ताब्यात असतानाही अनेक वर्षांपासून ‘तुला न मला, घाल कुत्र्याला’ या प्रमाणे शेकडो हेक्टर जमीन पडून असल्याने त्याचे कुरण झाले आहे. जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या या प्रकल्पाला जिल्हा प्रशासन आणि राजकीय अनास्थेचा फटका बसला आहे.ओझर येथील लढाऊ विमाननिर्मिती कारखाना उभारणीच्या वेळी मध्य रेल्वेच्या कसबे सुकेणे रेल्वेस्थानकापासून ओझर मिगपर्यंत सुमारे १४ किलोमीटर अंतराचा ब्रॉडगेज रेल्वेमार्ग तयार करण्यात आला होता; परंतु सध्या हा मार्ग बंद असून, जमीन मात्र रेल्वे प्रशासनाच्या ताब्यात आहे. हा मार्ग प्रशासनाने वापरात आणावा नाही तर संपादन केलेली जमीन मूळ शेतकऱ्यांना परत करावी, या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, दीपक पगार, सोमनाथ बोराडे यांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व कृषिमंत्री राधामोहन सिंह यांची दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर सुकेणे ते ओझर रेल्वेमार्गाचा प्रश्न चव्हाट्यावर आला. तीस वर्षांपूर्वी जिल्ह्याच्या आदिवासी भागाचा विकास होण्यासाठी तयार असलेल्या मार्गाचा ओझर मिग येथून विस्तार करून तो साकोरे मिग-चिंचखेड-खेडगाव-सोनजांब-तळेगाव वणी - वणी शहर - पांडाणे - घागबारी - बोरगाव-सापुतारा असा करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.कसबे सुकेणे रेल्वेस्थानकापासून ओझर-वणी-सापुतारा या रेल्वेमार्गाची मागणी आता जोर धरू लागली असून, ओझरपर्यंत असलेल्या तयार रेल्वेमार्गाचा विस्तार झाला तर ओझर, पिंपळगाव बसवंत, खेडगाव, वणी यासारख्या कृषी बाजारपेठा रेल्वेच्या नकाशावर येऊन सापुताऱ्यासारखे पर्यटनस्थळ आणि देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धस्थान शिर्डी आणि सप्तशृंगगड रेल्वे मार्गाने जोडली जातील. गुजरात आणि महाराष्ट्रातील भाविकांची मोठी सोय होईल.भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या ओझर येथील एचएएल कारखाना उभारणीसाठी मध्य रेल्वेच्या कसबे सुकेणे रेल्वेस्थानकापासून ते ओझर मिगपर्यंत सुमारे १४ किलोमीटर अंतराचा ब्रॉडगेज डिझेल इंजिन रेल्वेमार्ग तयार करण्यात आला होता. कारखाना उभारणीनंतर सदर मार्गावरील मालवाहतूक रेल्वेने बंद केली. वीस वर्षांपूर्वी या मार्गावरील लोखंडी रूळही काढून घेण्यात आले.सदरचा रेल्वे मार्ग ओझर कार्गो विमानतळासाठी वापरात आणण्याचे प्रयत्न पाच वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केले होते. एकीकडे नव्या रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी जमिनी मिळवण्यासाठी रेल्वेला आटोकाट प्रयत्न करावे लागत असताना दुसरीकडे मात्र जमीन ताब्यात असतानाही वापर होत नसल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. स्थानिक खासदार आणि जिल्ह्यातील उद्योजक व प्रशासन यांच्या उदासीनतेमुळे हा प्रकल्प दुर्लक्षित आहे. सध्या ताब्यात असलेल्या रेल्वेमार्गाच्या जमिनीवर अतिक्रमण होत असल्याच्या तक्रारी परिसरातून होत आहेत. मध्य रेल्वेमार्गावरील कसबे सुकेणे रेल्वेस्थानक ते ओझर हा मार्ग तयार असून, जमीन रेल्वेच्या ताब्यात आहे. ओझर-साकोरे-खेडगाव-वणी - बोरगाव-सापुतारा या केवळ ५० ते ५५ किलोमीटर अंतराचे नव्याने भूसंपादन करावे लागणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या खर्चात बचत होईल. शिवाय दिंडोरी, नवसारी, सुरत, वापी, दमण या भागात मोठ्या औद्योगिक वसाहती असल्याने मालवाहतुकीला या मार्गाचा लाभ होईल. ओझर कार्गो विमान तळासाठीही या मार्गाचा वापर करण्याचे मध्यंतरी जिल्हा प्रशासन विचाराधीन होते. मात्र त्यासाठी योग्य ती पावले का ुउचलली जात नाहीत हाच परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. (अपूर्ण)