शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘रेरा’च्या फेऱ्यात शेकडो बांधकाम प्रकल्प : अडचण

By admin | Updated: June 5, 2017 22:24 IST

पालिका निर्णय घेत नसल्याने पुन्हा खोळंबा

संजय पाठक / नाशिक : राज्यात ‘रेरा’ लागू झाल्यानंतर आत्तापर्यंत सध्या अल्प प्रकल्पांची नोंदणी झाली असली तरी ज्या प्रकल्पांना पूर्णत्वाचा दाखला नाही, असे सर्वच प्रकल्प नोंदण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक बांधकाम व्यावसायिकांची झोप उडाली आहे. यासंदर्भात अनेकांनी रेराचे अध्यक्ष गौतम चटर्जी यांना साकडे घालून जुन्या प्रकल्पांना वगळण्याची मागणी केली आहे.बांधकाम क्षेत्रावर नियंत्रण आणण्यासाठी आणि ग्राहकांना अधिकाधिक कायदेशीर संरक्षण मिळवून देण्यासाठी रेरा हा बांधकाम क्षेत्राच्या नियमनासाठी कायदा करण्यात आला असून, महाराष्ट्र शासनाने १ मे पासून त्याची अंमलबजावणी केली आहे. त्यानुसार आता प्रत्येक नवीन प्रकल्पासाठी बांधकाम व्यावसायिकांना किंवा विकासकांना या प्राधिकरणाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. त्याविषयी कोणाची तक्रार नाही. मात्र सध्या जे प्रकल्प कार्यान्वित आहेत, किंवा ज्यांना महापालिका किंवा नगरपालिकेकडून पूर्णत्वाचा दाखला मिळालेला नाही अशा प्रकल्पांची नोंदणीही करणे आवश्यक आहे. जे प्रकल्प नव्याने होत आहेत, त्याची नोंदणी करण्यास कोणाची हरकत नाही, परंतु रेरा येण्याच्या आत जे प्रकल्प पूर्णत्वाच्या दाखल्याविना रखडले आहेत, त्याची नोंदणी करणे अडचणीचे आहे. विशेषत: बांधकाम करताना डावे-उजवे केल्याने महापालिकेने पूर्णत्वाचा दाखला दिला नाही, अशा प्रकल्पांना रेरात गेल्यानंतर अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. नाशिकमध्ये असे शेकडो प्रकल्प असून, अनेक इमारतीत नागरिक राहण्यास आले आहेत. त्यांची अडचण दूर करण्यासाठी तरी पालिकेने पूर्णत्वाचा दाखला द्यावा, अशी मागणी असताना रेरामध्ये अशाप्रकारचे प्रकल्प गेल्यास अडचण अधिक वाढणार आहे. त्यामुळे महापालिकेने त्वरित पूर्णत्वाचा दाखला द्यावा, अशी मागणी आहे.