शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

शंभरफुटी रस्ता हगणदारीमुक्तच्या वाटेवर

By admin | Updated: July 24, 2016 23:48 IST

स्वच्छ भारत अभियान : राजीवनगर झोपडपट्टीत शौचालय उभारणी

संजय शहाणे नाशिककाही महिन्यांपूर्वी राजीवनगर झोपडपट्टीलगतच्या शंभरफुटी रस्त्यावरून मार्गक्रमण करताना नाक दाबून पुढे जावे लागायचे, हा अनुभव तेथून जाणाऱ्या प्रत्येकालाच यायचा. रस्त्याच्या दुतर्फा झोपडपट्टीतील रहिवाशांनी हगणदारी बनवल्याने दुर्गंधी सहन करण्यापलीकडे गेली होती. मात्र आता शंभरफुटी रस्ता हगणदारीमुक्त होण्याच्या वाटेवर आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत राजीवनगर झोपडपट्टीतील ६५0 रहिवाशांपैकी ६00 रहिवाशांनी शौचालय बांधण्यासाठी अनुदानासाठी अर्ज केला असून, पहिल्या टप्प्यात १२७ रहिवाशांना शौचालय उभारणीसाठी सहा हजार रुपये अनुदान देण्यात आले आहे. त्यापैकी १00 रहिवाशांनी शौचालय बांधले असल्याने त्यांना दुसऱ्या टप्प्याचे शौचालय बांधल्याचे छायाचित्र संबंधित विभागाकडे सादर केल्यावर सहा हजार रुपये मिळणार आहेत. असे प्रत्येक रहिवाशाला १२ हजार रुपये अनुदान मिळणार आहे.गेल्या अनेक वर्षांपासून झोपडपट्टीतील रहिवासी शौचविधीसाठी परिसरातील मोकळ्या भूखंडाचा वापर करत होते. परंतु भूखंड मालकाने संरक्षक भिंत बांधून जागा बंदिस्त केल्याने रहिवाशांची अडचण झाली. त्यामुळे रहिवाशांनी आपला मोर्चा रस्त्याकडे वळविला. शौचविधीसाठी सर्रासपणे शंभरफुटी रस्त्याच्या दुतर्फा जागेचा वापर होऊ लागला. रहिवाशांच्या शौचालयाचा प्रश्न सोडविण्यासाठी अनेकदा प्रयत्न झाले. परंतु त्यात यश येत नव्हते. दरम्यान, केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय उभारणीचा कार्यक्रम महापालिकेने हाती घेतला आणि स्थानिक नगरसेवक सतीश सोनवणे यांनी राजीवनगर झोपडपट्टी हगणदारीमुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला. आता दुसऱ्या टप्प्यात ४७३ रहिवाशांना पहिला टप्प्याचे सहा हजाराचे अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे घरघरात शौचालय उभारण्यात येत असल्याने येत्या काही दिवसांतच शंभरफुटी रस्ता हगणदारीमुक्त होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.