शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

परदेशात असलेल्या लासलगावकरांनी जोपासली माणुसकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 23:16 IST

कोरोनाच्या संकटात थेट अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या दोघा लासलगावकरांनी मदतीचा हात पुढे करीत माणुसकी जोपासली आहे.

लासलगाव : कोरोनाच्या संकटात थेट अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या दोघा लासलगावकरांनी मदतीचा हात पुढे करीत माणुसकी जोपासली आहे.योगेश कासट सध्या अमेरिकेत (कॅलिफोर्निया), तर दीपक प्रकाश बिडवई कॅनडात आहेत. कोरोनामुळे आपल्या मातृभूमीशी नाळ कायम ठेवीत योगेश कासटने नाशिक जिल्ह्यात पेठ तालुक्यातील दुर्गम भागातील कुटुंबांना १५ दिवस पुरेल एवढ्या संसारोपयोगी वस्तंूसाठी अमेरिकेतून ५ लाख रुपयांची मदत पाठविली आहे. दीपक बिडवई यांनी लासलगावचे सामाजिक कार्यकर्ते संजय बिरार यांना फोन करून त्यांच्याकडे लहानपणी घरी धुणी-भांडी करणाऱ्या शांताबाई कुºहाडे सध्या लासलगावमधे कुठे राहतात याची विचारणा करीत त्यांना मदतीची गरज असेल ती मी पाठवितो. त्यांच्यापर्यंत पोहोचवा, असे सांगितले. ही बाब बिरार यांनी नीलेश देसाई व पिंटू लिलानी यांना कळविली. त्यांनी शांताबाई कुºहाडे यांचा पत्ता व घर शोधले व लासलगाव येथे लोकसहभागातून गोळा करण्यात येणाºया जीवनापयोगी वस्तू त्यांच्या घरी पोहोचविल्या. ही माहिती समजताच दीपक बिडवई यांनी तहसीलदार दीपक पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार उपसरपंच जयदत्त होळकर यांनी सुरू केलेल्या कोरोना सहायता निधीस पंचवीस हजार रुपये पाठविले. यावेळी उपसरपंच, जयदत्त होळकर ,संतोष ब्रह्मेचा, गुणवंत होळकर, डॉ. विकास चांदर, नीलेश देसाई लासलगावचे ग्रामविकास अधिकारी शरद पाटील व संजय बिरार उपस्थित होते.कोरडा शिधा वाटपलासलगाव : निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यांच्या आवाहनाला साद देत लासलगाव येथील जयदत्त होळकर मित्रमंडळाच्या वतीने ग्रामपंचायतीच्या सहकार्याने शहरातील दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून सुमारे २७० गरजू कुटुंबांना कोरड्या शिध्याचे वाटप केले. तहसीलदार दीपक पाटील यांनी लासलगाव येथे उपसरपंच जयदत्त होळकर यांची भेट घेऊन गरजूंना मदतीसाठी आवाहन केले. त्यानुसार येथील जयदत्त होळकर मित्रमंडळ व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने शहरातील दानशूर व्यक्तींना किराणा संकलित करण्याचे आवाहन केले होते. ग्रामविकास अधिकारी शरद पाटील, माजी उपसरपंच संतोष ब्रह्मेचा, गुणवंत होळकर, दिनेश जाधव, मयूर बोरा, डॉ. विकास चांदर, प्रिन्स भल्ला, पिंटू शिकलकर, महेश होळकर, संजय जाधव आदी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याfoodअन्न