शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

संतांच्या संगतीने मानवाची प्रगती

By admin | Updated: December 28, 2015 22:17 IST

माधवगिरी महाराज : जनार्दन स्वामी पालखी सोहळा

पंचवटी : सध्याच्या विज्ञान युगात तांत्रिक प्रगती होत आहे, मात्र मानवाची वैचारिक प्रगती होत नसल्याने जीवन भकास होत चालले आहे. इतर तंत्रज्ञानामुळे मुले संस्कारहीन होत असल्याने संतांची संगत गरजेची आहे. यामुळेच मानवाची प्रगती होऊन सुख, समाधान लाभते, असे मत संत जनार्दन स्वामी महाराज यांचे शिष्य माधवगिरी महाराज यांनी मांडले. हिरावाडी (शक्तीनगर) येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानच्या वतीने संत जनार्दन स्वामी महाराज यांचा पालखी सोहळा व भजन, प्रवचन, सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी माधवगिरी महाराज यांचे प्रवचन झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी पुढे असे सांगितले की, नाशिकही पवित्र अशी भूमी आहे. संतांच्या संगतीने भक्ती आणि धर्मात वाढ होते. संस्कृत भाषा ही सर्व भाषांची जननी आहे म्हणून संस्कृत भाषेला देवभाषा असेही संबोधतात. संस्कृत भाषा समजायला कठीण असली तरी ती आत्मसात केल्यास वाणी शुद्ध होते, असेही ते शेवटी म्हणाले. यावेळी संतोषगिरी महाराज यांचा भजन गायनाचा कार्यक्रम झाला. सकाळी मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर संत जनार्दन स्वामी महाराजांच्या प्रतिमेची परिसरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. स्व. मीनाताई क्रीडा संकुल येथून पालखी मिरवणुकीला प्रारंभ झाला. संपूर्ण हिरावाडी परिसरातून पालखी मिरवणूक काढण्यात आल्यानंतर संकल्प लॉन्ड्री येथे कार्यक्रमस्थळी समारोप करण्यात आला. या पालखी मिरवणुकीनंतर भजन, प्रवचनाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी प्रभाग सभापती सुनीता शिंदे, नगरसेवक रुचि कुंभारकर आदिंसह भाविक उपस्थित होते. सायंकाळी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. पालखी सोहळा यशस्वीतेसाठी संजय बुंदेले, अनिल चव्हाण, संजय भवर, दादा आमले, योगेश चव्हाण, नितीन बुंदेले, योगेश दौडे, विश्वनाथ बोडके, करण जाधव, तुषार विभांडिक, बंडू साबळे आदिंसह छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हातभार लावणाऱ्या परिसरातील सर्व देणगीदार, हितचिंतक यांचे मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले. (वार्ताहर)