शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

झाडांना मानवी अन् नैसर्गिक धोका

By admin | Updated: August 1, 2016 00:59 IST

सर्वेक्षण गरजेचे : निष्काळजीपणे केलेल्या छाटणीमुळे सुरक्षिततेला छेद

नाशिक : मागील काही दिवसांपासून शहरात वृक्ष कोसळण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिका प्रशासनाने शहरातील धोकेदायक वृक्षांचे सर्वेक्षण करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, वृक्ष कोसळण्यामागे नैसर्गिक कारणांबरोबरच विकृत मनोवृत्तीमधून केले जाणारे कृत्यही कारणीभूत असल्याची शंका उपस्थित केली जात आहे.वकीलवाडीमध्ये दोन आठवड्यापूर्वी कडुनिंबाचे सुमारे चाळीस वर्ष जुने झाड अचानकपणे बुंध्यापासून तुटून कोसळल्याची दुर्घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी न झाल्याने मोठा अनर्थ टळला; मात्र झाडे कोसळण्यामागची कारणमीमांसा महापालिका किंवा जिल्हा प्रशासनाकडून केली जात नाही. फांद्यांची छाटणी करून धोका कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र अशास्त्रीय छाटणीमुळे वृक्षाची सुरक्षितताच धोक्यात येते. याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. ‘लोकमत’ने यापूर्वीच ‘अशास्त्रीय छाटणीमुळे वृक्षांचा धोका वाढतो’ याकडे लक्ष वेधले होते. जीर्ण वृक्ष तसेच वाळवी लागून कुजलेल्या बुंध्याचे वृक्ष किंवा नुसतीच ओंडक्याच्या स्वरूपात दिसणाऱ्या झाडांचे सर्वेक्षण करण्याची गरज आहे. वृक्षारोपण मोहिमेत शहराच्या अनेक भागात नवीन झाडे लावली जातात. परंतु गेल्या अनेक वर्षापासून शहरात उभी असलेल्या झाडांची मात्र काळजी घेतली जात नाही. (प्रतिनिधी)