शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सापुतारा-वणी राज्य महामार्गावरील भलामोठा खड्डा ठरतोय जीवघेणा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 01:01 IST

मृत्यूचा सापळा बनत असून जीवघेणा ठरत आहे. भितबारी हा भाग सुरगाणा, दिंडोरी व कळवण या तीन तालुक्याच्या पोलीस हद्दीवर येत असल्याने तक्रार नेमकी करायची कोणाकडे याचा प्रश्न अनेकांना पडला आहे.

ठळक मुद्देसुरगाणा : वणी ते सापुतारा राज्य महामार्गावरील घागबारी नजीकच्या भितबारी रस्त्यावरील भलामोठा खड्डा

मृत्यूचा सापळा बनत असून जीवघेणा ठरत आहे. भितबारी हा भाग सुरगाणा, दिंडोरी व कळवण या तीन तालुक्याच्या पोलीस हद्दीवर येत असल्याने तक्रार नेमकी करायची कोणाकडे याचा प्रश्न अनेकांना पडला आहे.आतापर्यंत पाच ते सात युवकांना या खड्यांमुळे दूचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात होऊन गंभीर दुखापत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर यापुर्वीही कुंदेवाडी येथील एका दुचाकीस्वाराचा डोक्याला गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाल्याचे घागबारी येथील पोलीस पाटील गोपाळ गायकवाड यांनी सांगितले.या जागेवर उतार असल्याने उंबरपाडा कडील टोलनाका पार करून वाहने वेगात येतात. त्यामुळे खड्डा दुरवरुन चालकाच्या लक्षात येत नाही. वाहन अगदी जवळ आल्याने समोर खड्डा असल्याचे लक्षात येते. अशावेळी चालकांची धांदल उडून वाहनावरील नियंत्रण सुटते व चालक अपघातास बळी ठरतो किंवा गंभीर जखमी होतात.यापुढे अपघात होऊ नये यासाठी महामार्गावर पडलेले हे मोठे खड्डे कायमस्वरूपी मजबूतीने बुजविण्याची मागणी घागबारी येथील पोलीस पाटील गोपाळ गायकवाड, तुळशीदास पिठे, लक्ष्मण गायकवाड, गुलाब गांगुर्डे, लक्ष्मण गायकवाड, चिंतामण गायकवाड आदींनी केली आहे.यावेळी गांधीगीरी करत टेपने खड्ड्याचे मोजमाप घेतले असता जवळपास एक मीटर चौरस व अर्धा फुट खोलीचा हा खड्डा आहे. याचे माप महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित कार्यकारी अभियंता यांना पाठविण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.खड्डा कित्येकदा मातीने बुजविण्यात आला. मात्र रहदारीमुळे आठवडाभरातच माती निघून जाऊन मोकळा होतो. याच महामार्गावर सापुतारा पर्यंत खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अपघातास कारणीभूत ठरत असलेल्या या महामार्गावर तात्पुरती मलमपट्टी न करता चांगल्या दर्जाची दुरुस्ती करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागroad safetyरस्ते सुरक्षा