शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

बारावीचा निकाल पुढील आठवड्यात

By admin | Updated: May 28, 2017 01:48 IST

नाशिक : बारावीच्या परीक्षांचा निकाल पुढील आठवड्यात आॅनलाइन जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याबाबतची अधिकृत घोषणा बोर्डातर्फे सोमवारपर्यंत करण्यात येऊ शकते.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी, मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षांचा निकाल पुढील आठवड्यात, तर दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात आॅनलाइन जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याबाबतची अधिकृत घोषणा बोर्डातर्फे सोमवारपर्यंत करण्यात येऊ शकते. निकालाबाबत सोशल मीडियावरील मेसेजवर विद्यार्थी, पालकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातील सूत्रांनी ही माहिती दिली. दहावी-बारावीच्या परीक्षांच्या निकालाच्या तारखांबाबत सोशल मीडियावर वेगवेगळे मेसेज फिरत आहेत. यात बारावीचा निकाल २८ मे रोजी; तर दहावीचा निकाल ३० मे रोजी जाहीर होणार आहे, असे म्हटले आहे. तर काही मेसेजेसमध्ये अन्य तारखांचाही समावेश होता. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम निर्माण होत होता. मागील वर्षी बारावीचा निकाल २५ मे रोजी जाहीर झाला होता. त्या वेळचा मेसेज काही व्यक्तींनी गेल्या काही दिवसांत व्हायरल केला होता. त्यामुळेही विद्यार्थी संभ्रमात होते. या पार्श्वभूमीवर मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता सोशल मीडियावर फिरणाऱ्या निकालाच्या तारखा अधिकृत नाहीत. मंडळाने अजून निकालाची तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी या तारखांवर विश्वास ठेवू नये, असे मंडळातील सूत्रांनी स्पष्ट केले. बारावीचा निकाल तयार करण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. येत्या दोन दिवसांत बैठक घेऊन आॅनलाइन निकालाची तारीख जाहीर केली जाणार आहे.