येवला : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा येवले तालुक्यातील पाचही केंद्रांवर इंग्रजीच्या पेपरसह सुरळीत सुरु झाली. कोणताही कॉपीचा प्रकार घडला नसल्याची माहिती परीक्षक आर. के. गायकवाड यांनी दिली. येवला तालुक्यातील पाचही केंद्रांमधून ३७३६ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. येवला शहरातील दक्षता पथकाने शहरातील दोन्ही केंद्रांना भेटी दिल्या. स्वामी मुक्तानंद विद्यालय केंद्र क्र. २१० मधील एक हजार विद्यार्थी हजर होते. एस.एन.डी. केंद्र क्रमांक २११ मध्ये ११६४ विद्यार्थी हजर होते. तसेच न्यू इंग्लिश विद्यालय नगरसूल केंद्र क्र. २१२ मध्ये ४०५ विद्यार्थी हजर होते. येवला मुख्य परीक्षा केंद्रात के. यू. गाढे, पी. एस. मांडळकर, पी. के. गावंडे हे काम पाहत आहे. पाचही केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार या दरम्यान घडला नाही. (वार्ताहर)
येवल्यात बारावीची परीक्षा सुरळीत
By admin | Updated: February 28, 2017 23:21 IST