नाशिक : आदर्श संसद ग्राम योजनेत करावयाच्या कामांसाठी कुठलेच स्त्रोत किंवा निधी नसताना गाव आदर्श करायचे कसे? असा प्रश्न खासदार हेमंत गोडसे यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात शून्य प्रहारात उपस्थित केला.जिल्ह्यातील अंजनेरी हे गाव खासदार हेमंत गोडसे यांनी दत्तक घेतले असून, या गावातील ग्रामस्थांनी सूचविलेली कामे कोणत्या विभागाकडून करावयाची अन् यासाठी निधी कोठून उपलब्ध होईल, याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी विविध विभागांकडे मागितली होती. त्यांना विविध विभागांकडून उत्तरे प्राप्त झाली असून, त्यात या योजनेंतर्गत करावयाच्या विकासकामांकरिता असा निधी नसल्याचे उत्तर विभागांकडून मिळाले आहे. आदर्श संसद ग्राम योजनेकरिता निधी उपलब्ध करून देण्याकरिता स्वतंत्र स्त्रोत निर्माण करावेत किंवा विविध विभागांकरिता निधी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी संसदेत शून्य प्रहारात बोलताना केली. आदर्श संसद ग्राम योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेत आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची घोषणा जयप्रकाश नारायण यांच्या जन्मदिवशी ११ आॅक्टोबर २०१४ ला केली होती.
निधी नसताना आदर्श संसद ग्राम करायचे कसे?
By admin | Updated: January 3, 2016 23:51 IST