शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

कसा देणार संगणकीय सातबारा उतारा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 01:05 IST

गेल्या बारा वर्षांपासून सुरू असलेले संगणकीय सातबारा उताºयाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नसून, राज्य सरकारने स्वातंत्र्य दिनापासून आॅनलाइन प्रणालीने १५ आॅगस्टच्या मुहूर्तावर संगणकीय सातबारा उतारा खातेदारांना देण्याचे जाहीर केलेले असले तरी, राज्यातील सुमारे ३६ हजार गावांतील सातबारा उताºयातील चुका अद्याप दुरुस्त करणे बाकी असल्याचे अलीकडे केलेल्या पाहणीतून स्पष्ट झाल्याने शासनाच्या घोषणेने यंत्रणा हवालदिल झाली आहे.

नाशिक : गेल्या बारा वर्षांपासून सुरू असलेले संगणकीय सातबारा उताºयाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नसून, राज्य सरकारने स्वातंत्र्य दिनापासून आॅनलाइन प्रणालीने १५ आॅगस्टच्या मुहूर्तावर संगणकीय सातबारा उतारा खातेदारांना देण्याचे जाहीर केलेले असले तरी, राज्यातील सुमारे ३६ हजार गावांतील सातबारा उताºयातील चुका अद्याप दुरुस्त करणे बाकी असल्याचे अलीकडे केलेल्या पाहणीतून स्पष्ट झाल्याने शासनाच्या घोषणेने यंत्रणा हवालदिल झाली आहे.दोन दिवसांपूर्वी राज्याचे महसूल सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी संगणकीय सातबारा उताºयाच्या कामकाजाचा आढावा घेतला असता त्यात ही बाब उघड झाली. शासनाने यापूर्वी १ मे महाराष्टÑ दिनापासून संगणकीय सातबारा उतारा देण्याचे जाहीर केले होते, परंतु सॉफ्टवेअर व सर्व्हरच्या त्रासामुळे तलाठी, मंडळ अधिकाºयांना मुदतीत काम पूर्ण करणे शक्य झाले नाही. म्हणून शासनाने १५ आॅगस्टचा मुहूर्त मुकर्रर केला.  महसूल सचिवांनी घेतलेल्या आढाव्यातदेखील वारंवार डाउन होणाºया सर्व्हरचा प्रश्न राज्यातील विभागाीय आयुक्तांनी उपस्थित करून यातील अडचणी सोडविण्याची मागणी केली. या अडचणींची महसूल सचिवांनीदेखील त्याच्याशी सहमती दर्शविली, मात्र आता शासनाने घोषणाच केलेली असल्यामुळे १५ आॅगस्टपर्यंत प्रत्येक जिल्ह्णात किमान दोनशे गावांचे सातबारे तरी संगणकीय बिनचूक असावेत, अशा सूचना केल्या आहेत.प्रातिनिधिक वाटप?स्वातंत्र्य दिनापासून संगणकीय सातबारा उताºयांच्या वाटपाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र अद्याप अनेक गावांमधील काम बाकी आहे. यामुळे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण समारोहानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते फक्त प्रातिनिधिक स्वरूपात संगणकीय सातबारा उताºयाचे वाटप करून  मुहूर्त साधला जाणार असल्याचे समजले आहे.राज्यात ४३ हजार ९४३ गावे असून, यंत्रणेने तयार केलेले संगणकीय सातबारांचे गावोगावी चावडी वाचन करण्यात येऊन हस्तलिखित सातबारा व संगणकीय सातबारा यांच्यातील चुका शोधण्यात आल्या. या चुकांची दुरुस्ती करण्यासाठी ‘रि-एडिट’ मॉड्यूल सॉफ्टवेअर तयार करण्यात आले. परंतु या सॉफ्टवेअरमध्ये काम करताना शासनाचे सर्व्हर वेळोवेळी डाउन होत असून, स्पीड मिळत नसल्याचे तलाठ्यांचे म्हणणे आहे.गेल्या काही दिवसांत फक्त ७७४५ गावांचे सातबारा उतारे बिनचूक होऊ शकले म्हणजे आॅनलाइन प्रणालीने ते देण्यास हरकत नाही; मात्र शासनाने मागेल त्याला संगणकीय सातबारा उतारा देण्याचे जाहीर केले असून, ३६ हजार गावांमध्ये बिनचूक उताºयाचे काम झालेलेच नसल्याने यंत्रणा हवालदिल झाली आहे.