शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

राणे भाजपाला कसे चालतील? : केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:15 IST

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करप्शनला झिरो टॉलरन्स अशी घोषणा केली होती. अशावेळी राजकारणातून बेकायदा मालमत्ता जमा करणारा नेता भाजपाला कसा चालू शकेल, याबाबत राज्यातील भाजपा नेतृत्वच विचार करेल, असा टोला अर्थराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी लागवला आहे.चेंबर आॅफ कॉमर्सच्या परिषदेसाठी गुरुवारी नाशिक येथे आलेल्या केसरकर यांनी कॉँग्रेस नेते ...

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करप्शनला झिरो टॉलरन्स अशी घोषणा केली होती. अशावेळी राजकारणातून बेकायदा मालमत्ता जमा करणारा नेता भाजपाला कसा चालू शकेल, याबाबत राज्यातील भाजपा नेतृत्वच विचार करेल, असा टोला अर्थराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी लागवला आहे.चेंबर आॅफ कॉमर्सच्या परिषदेसाठी गुरुवारी नाशिक येथे आलेल्या केसरकर यांनी कॉँग्रेस नेते नारायण राणे यांच्या प्रवेशाबाबत हे विधान केले.बेहिशेबी मालमत्ता जमावणाºयांची यादी लवकरच उच्च न्यायालयात सादर केली जाणार आहे. त्यात ज्यांचे नाव प्रथम क्रमांकावर आहे, त्याला प्रवेश देण्याबाबत भाजपाचे राज्यातील नेते निर्णय घेतील असे सांगून ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा देण्याची घोषणा केली आणि लोकांनी त्यांना साथ दिली. आता नेत्याच्या घोषणेनंतर राजकारणातून पैसा कमविणाºयांना प्रवेश देण्याबाबत राज्यातील भाजपा ठरवेल, असेही ते म्हणाले.जीएसटीच्या अडचणींबाबत बोलताना केसरकर यांनी जीएसटी कॉन्सीलमध्ये महाराष्टÑाचा वाटा मोठा असल्याने अनेक करांमध्ये सुधारणा करून घेण्यात येत आहे. कोकणात काजूचे उत्पादन असलेल्या काजूवरील जीएसटी १२ वरून पाच टक्के करण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यात यश आले आहे असे सांगून त्यांनी शासकीय ठेकेदारांनी जीएसटीमुळे शासकीय कामांवर बहिष्कार टाकल्याच्या मुद्द्यावर बोलताना ज्यांनी याही परिस्थितीत कामे करण्याची तयारी दर्शवली त्यांची कामे सुरू आहेत. ज्या कामांना प्रतिसाद मिळाला नाही, त्या कामांसाठी शॉर्ट टर्म ई टेंडर मागविण्याचा विचार सुरू असल्याचेही ते म्हणाले. रियल इस्टेट क्षेत्रावर काही प्रमाणात विशेषत: अर्धवट इमारत बांधकामे झाली आहेत, त्यावर परिणाम झाला आहे. परंतु पूर्णत्वाचा दाखला घेतलेल्यांना अडचण उद्भवली नसल्याचे ते म्हणाले.नाशिकच्या एलबीटी अधिभाराची चौकशी१ जुलैपासून देशभरात जीएसटी लागू झाला त्यावेळी महाराष्टÑात असलेला एलबीटी रद्द करण्यात आला. असे असूनही नाशिकमध्ये मात्र मुद्रांक शुल्क विभागात मात्र घरे जमिनीच्या खरेदी-विक्रीसाठी पूर्वीप्रमाणेच एक टक्का एलबीटी सेस आकारण्यात येत आहे. यासंदर्भात केसरकर यांना प्रश्न करताच त्यांनी जो कायदा रद्द केला त्यावर सेस कसा आकारला जाऊ शकतो, असा प्रश्न करीत या प्रकाराची चौकशी करण्यात येईल, असे सांगितले. एलबीटी अधिभाराची चौकशीएलबीटी रद्द करण्यात आला असूनही नाशिकमध्ये मात्र घरे जमिनीच्या खरेदी-विक्रीसाठी पूर्वीप्रमाणेच एक टक्का एलबीटी सेस आकारण्यात येत आहे. यासंदर्भात केसरकर यांना प्रश्न करताच त्यांनी जो कायदा रद्द केला त्यावर सेस कसा, असा प्रश्न करीत या प्रकाराची चौकशी करण्यात येईल, असे सांगितले.