शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

खर्च केला किती मोठा; तरीही पदरी कमीच नोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:19 IST

मानोरी : येवला तालुक्यात शेतकरी कांद्यापाठोपाठ टोमॅटोचे देखील विक्रमी उत्पादन मोठ्या प्रमाणात घेत असून, सध्या टोमॅटोला मिळत असलेल्या ...

मानोरी : येवला तालुक्यात शेतकरी कांद्यापाठोपाठ टोमॅटोचे देखील विक्रमी उत्पादन मोठ्या प्रमाणात घेत असून, सध्या टोमॅटोला मिळत असलेल्या कमी दरामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. मिळणाऱ्या भावातून टोमॅटो पिकाला केलेला खर्च फिटणे देखील शेतकऱ्यांना दुरापास्त झाल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसून येत असून अनेक शेतकऱ्यांनी आपला टोमॅटो रस्त्याच्या कडेला टाकून देत आपला रोष व्यक्त केला आहे.

येवला तालुक्यातील शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात टोमॅटो पिकाचे उत्पादन घेत असतात. दरवर्षी काही का होईना; पण चांगल्या प्रकारे दर शेतकऱ्यांना मिळत असतो. मात्र, यावर्षी टोमॅटो पिकाला मिळत असलेला दर बघून बळीराजाच्या आर्थिक संकटात चांगली मोठी भर पडताना दिसून येत आहे. टोमॅटो लागवडीसाठी केलेला खर्च निघणे देखील कठीण झाले असून कमी दराने टोमॅटो विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दरवर्षी टोमॅटोला प्रतिकॅरेट सरासरी २०० ते ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत असतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बाजार समित्यात १ क्रेट टोमॅटोला २० ते ५० रुपयांपासून भाव मिळत आहे. ह्या दरामुळे टोमॅटो पिकाचा लागवड खर्च फिटणे कठीण झाले असून, शेतकऱ्यांना गाडी भाडे खिशातून घालण्याची वेळ आली आहे. टोमॅटो पिकाच्या लागवडीसाठी प्रतिएकर अंदाचे जवळपास दीड लाख रुपये इतका खर्च येत असतो. यात नांगरणी २२०० रुपये, रोटर मारण्यासाठी २२०० रुपये, सऱ्या पाडण्यासाठी १००० रुपये इतका दर शेतकऱ्यांना मोजावा लागतो. त्यात मल्चिंग पेपर टाकण्यासाठी ५००० रुपये, रोपांचा खर्च २० हजार रुपये, लागवडीसाठी खर्च ५००० रुपये, औषधांचा खर्च अंदाजे ७० हजार रुपये, टोमॅटो बांधणीसाठी बांबू व सुतळी याचाही इतर खर्च येत असतो. त्यात अजून टोमॅटोची तोडणी व वाहतूक खर्च हा अंदाजे ५० रुपये प्रतिकॅरेट इतका येत असतो. टोमॅटोच्या प्रतिकॅरेटला किती दर मिळेल याची शाश्वती नसली तरी तोडणी व वाहतूक हा अंदाजे ५० रुपये खर्च हा निश्चितच एका कॅरेटला द्यावा लागतो. एवढा सगळा खर्च झाला असताना देखील टोमॅटोला कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. असाच पुढेही दर मिळत राहिला तर टोमॅटो उत्पादकांना टोमॅटोची लागवड करणे कठीण होणार असल्याचे चित्र दिसत आहे. शासनाने या गोष्टीकडे लक्ष घालावे व टोमॅटो पिकाला तसेच इतरही पिकांना चांगल्या पद्धतीने भाव मिळेल व शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल अशा उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने केली जात आहे.

इन्फो

रस्त्याच्या कडेला फेकले जात आहेत टोमॅटो....

टोमॅटोला कमी दर मिळत असल्याने हतबल झालेला शेतकरी आपले टोमॅटो रस्त्याच्या कडेला टाकून देत असल्याचे दिसून येत आहे. तसेच टोमॅटोला मिळत असलेला दर बघून साधा उत्पादन खर्च देखील फिटत नसल्याने शेतकरी टोमॅटो तोडणी न करण्यास पसंती देत असून झाडालाच टोमॅटो लाल होऊन नंतर तो तोडून रस्त्याच्या कडेला फेकले जात आहेत. सध्या ग्रामीण भागात असलेल्या सर्व रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात टोमॅटो फेकून दिल्याचे ढिगारे दिसून येत आहेत.

कोट....

शेतकऱ्यांचे आर्थिक भवितव्य हे पूर्ण शेतीवर अवलंबून आहे. मागील काही दिवसांपासून टोमॅटोला कमी भाव मिळत असल्याने आमचा यातून साधा उत्पादन खर्च देखील फिटत नाही. टोमॅटो तोडणीला येणाऱ्या मजुरांचा खर्च आणि गाडी भाडे या दोन गोष्टीला मोठ्या प्रमाणात खर्च येत असून, यातून टोमॅटोला मिळणाऱ्या दरातून तोडणीचा आणि वाहतुकीचा खर्च देखील फिटत नसल्याने बळीराजा हतबल झाला आहे.

- कल्याण कोटकर, टोमॅटो उत्पादक शेतकरी, शिरसगाव लौकी.

फोटो : २७ टोमॅटो

कवडीमोल दरामुळे शिरसगाव लौकी येथे रस्त्याच्या कडेला फेकलेले टोमॅटो.