शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

महागाईच्या तडाख्याने गृहिणी बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:11 IST

पांगरी येथे तरुणाची आत्महत्या पांगरी : सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे २६ वर्षीय तरुणाने विहिरीत आत्महत्या केल्याची घटना घडली. चंद्रकांत ...

पांगरी येथे तरुणाची आत्महत्या

पांगरी : सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे २६ वर्षीय तरुणाने विहिरीत आत्महत्या केल्याची घटना घडली. चंद्रकांत प्रभाकर चव्हाण असे तरुणाचे नाव असून तो खासगी गाडीवर चालक म्हणून काम करतो. सायंकाळी पाऊस आल्यानंतर मित्रांना घरी जातो असे सांगून तो पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या विहिरीकडे गेला. त्यानंतर त्याने आत्महत्या केली. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

दिव्यांगाला व्हीलचेअर

सिन्नर : येथील प्रहार जनशक्ती पक्ष व सोमठाणे शाखेच्यावतीने दिव्यांग पवन धोक्रट यांना व्हीलचेअरचे वितरण करण्यात आले. जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे, सिन्नर तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांच्याहस्ते व्हीलचेअर देण्यात आली. यावेळी युवा जिल्हाध्यक्ष जगन काकडे, सरचिटणीस नितीन गवळी, शहराध्यक्ष दौलत धनगर यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

‘लायन्स’कडून कोविड सेंटरला साहित्य

सिन्‍नर : लायन्स क्लब ऑफ सिन्‍नर सिटीकडून इंडिया बुल्स कोविड सेंटरला नेहमी लागणारे व गरज असलेले साहित्य देण्यात आले. सॅनिटायझर हॅण्डग्लोव्हज्‌, बेडशीट, पिण्याच्या पाण्यासाठी वीस लिटर क्षमतेचे जार आदी साहित्य वैद्यकीय अधिकार्‍यांकडे सुपूर्द करण्यात आले. कोरोना महामारीत यापूर्वीदेखील लायन्स क्‍लबने अनेकवेळा वस्तू स्वरूपात रुग्णालयास मदत केली आहे. यावेळी लायन्स क्लब ऑफ सिन्‍नर सिटीचे कॅबिनेट अधिकारी डॉ. विजय लोहारकर, मनीष गुजराथी, सुरेश कट्यारे आदी उपस्थित होते. क्लबच्यावतीने नाशिक येथील काठे गल्लीतल्या अनाथ मुलींच्या वसतिगृहाला किराणा साहित्य देण्यात आले.

चापडगावला १०६ जणांचे लसीकरण

सिन्नर : तालुक्यातील चापडगाव येथील ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या शिबिरात ४५ वर्षांवरील १०६ लोकांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली. ग्रामपंचायत सदस्य संदीप सांगळे यांनी लसीकरण शिबिराची मागणी केली होती. दापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन म्हस्के, आरोग्य सेविका जी. पी. भारती, सीएचओ रत्नमाला पौळ, आरोग्यसेवक वणवे आदींनी ग्रामस्थांचे लसीकरण केले. यावेळी ग्रामसेवक प्रवीण बुरसे, सरपंच लीला मेंगाळ, उपसरपंच कचरू मेंगाळ, ग्रामपंचायत सदस्य संदीप सांगळे, सखाराम मेंगाळ, गोरख जाधव, संपत मेंगाळ, यमुना आव्हाड, शोभा सांगळे, सुरेखा मेंगाळ, आशा कामगार लक्ष्मी भालेराव, योगिता भालेराव, मोतिलाल सांगळे, भगवान सांगळे, नवनाथ सूर्यवंशी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.