शहराच्या मध्यवर्ती भागातील तीळभांडेश्वर लेनमधील चिंतामणी सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत असलेल्या सर्व सदनिकांच्या दरवाजांच्या कड्या चोरट्यांनी बाहेरून बंद करून घेतल्या होत्या. यानंतर चोरट्यांनी अनिल अंबादास चव्हाण यांच्या मालकीचे जुन्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश करत काही रोख रकमेसह चांदीच्या देवतांच्या मूर्तींसह दीड ते दोन तोळे सोन्याचे दागिने लांबविल्याचे चव्हाण यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. येथील रहिवाशांशी पोलिसांनी संवाद साधला असता रहिवाशांनी चोरट्यांची चोरीची अफलातून पद्धत कथन करत रात्रीची पोलीस गस्त वाढविण्याची मागणी केली. दरम्यान, आठ ते दहा तोळे सोन्याचे दागिने आणि पाच हजारांची रोकड चोरीला गेल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी यांनी सांगितले. संध्याकाळी उशिरापर्यंत या घरफोडीप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
---इन्फो--
वर्तमानपत्र विक्रेत्यांमुळे झाला उलगडा
चिंतामणी सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या सोनल बागुल यांच्या भावाला सकाळच्या सुमारास रेल्वेस्थानकावर जायचे असल्याने ते लवकर निघण्याच्या तयारीत असताना त्यांनी दार उघडण्याचा प्रयत्न केला असता दाराला बाहेरून कडी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी कडी उघडण्यासाठी शेजाऱ्यांना मोबाइलवरून संपर्क करत सांगितले. त्यावेळी दरवाजाच्या भिंगामधून डोकावून बघितले असता त्यांच्याही दरवाजाची कडी बाहेरून लावलेली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरम्यान, त्यांनी याबाबत फोनवरून कल्पना दिली. याचवेळी पेपर टाकणारा विक्रेता नेहमीप्रमाणे आला असता त्यांनी बागुल यांच्या घराची कडी उघडून दिली. तेव्हा अन्य रहिवाशांच्या दारे तपासली असता सर्वांची दारेे बाहेरून कडी लावून बंद केलेली होती आणि चव्हाण यांच्या बंद घराचे कुलूप तोडलेले आढळून आले.
260721\26nsk_33_26072021_13.jpg
घरफोडी