शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती ग्राहकांना बसणार दरवाढीचा ‘शॉक

By admin | Updated: February 19, 2015 00:31 IST

’महावितरणचा प्रस्ताव : एप्रिलपासून अंमलबजावणी शक्य

नाशिक : महावितरण कंपनीने आर्थिक तोट्यात असल्याचे कारण पुढे करीत पुन्हा एकदा दरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे. प्रस्तावित दरवाढीनुसार घरगुती ग्राहकांना सर्वाधिक फटका बसणार असून, त्यांच्या वीजबिलात १० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.महावितरणने सादर केलेल्या दरवाढीच्या प्रस्तावानुसार घरगुती वीजवापराचे प्रस्ताव बदलून ग्राहकांसाठी विविध श्रेणी तयार करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ० ते ७५, ७६ ते १२५, १२६ ते ३०० युनिट वापरणाऱ्या वीजग्राहकांना स्वतंत्र श्रेणीत आणण्यात आले आहे. विशेष म्हणजे ७६ ते १२५ युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांच्या नव्या श्रेणीमुळे घरगुती ग्राहकांवर मोठी दरवाढ लादली जाणार आहे. ० ते ७५ युनिट वीज वापरणाऱ्यांना ४.१६ रु. प्रति युनिट याप्रमाणे दर आकारला जाणार आहे. तर ७६ ते १२५ युनिट वीज वापरणाऱ्यांना ५.५५ रु. प्रति युनिट इतका दर प्रस्तावित आहे. तर १२६ ते ३०० युनिटसाठी ७.१० रु. असा दर ठरविण्यात आला आहे.महावितरणने यंदाच्या दरवाढीत घरगुती ग्राहकांवर दरवाढ लादल्यामुळे या दरवाढीस मोठा विरोध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रस्तावित दरवाढ लागू करण्यापूर्वी राज्यभर वीज नियामक आयोग सुनावणी करणार असून, महावितरणच्या या प्रस्तावावर वाशी, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, पुणे आणि नाशिक येथे जनसुनावणी होणार आहे.दरम्यान, दरवाढीसंदर्भात केवळ तोट्याचे कारण दाखविल्यामुळे महावितरण अडचणीत येण्याची शक्यता आहे. यापूर्वी न्यायालयाने महावितरणला थकबाकीदारांकडील वसुली करण्याचे आदेशीत केले होते, मात्र थकबाकी वसुली न करताच तोट्याचे कारण दाखविण्यात आल्यामुळे प्रस्तावित दरवाढ काहीअंशी कमी करण्यासाठी ग्राहक मंडळे जनसुनावणीत बाजू मांडणार आहेत. या सर्व शहरांमध्ये जनसुनावणी झाल्यानंतर साधारणपणे एप्रिल-मे मध्ये नवीन दरवाढीचा अंतिम मसुदा तयार होण्याची शक्यता आहे. महावितरणने दाखल केलेल्या वीजदरवाढीच्या प्रस्तावात ८ ते १० टक्के वाढ सुचविली आहे. मात्र गेल्या वर्षभरात महावितरणने ग्राहकांवर अधिभार लादल्यामुळे ग्राहकांच्या वीजबिलात अगोदरच वाढ झालेली आहे. दरवाढीच्या प्रस्तावापूर्वी ग्राहकांकडून विविध शिर्षाखाली वसूल केलेल्या दराची वजावट होणार आहे का, असा प्रश्न आताच ग्राहक पंचायतीने उपस्थित केला आहे. दरम्यान, दरवाढ प्रस्तावापूर्वीच मुंबईत झालेल्या सुनावणीत राज्यातील तमाम वीजग्राहक संघटनांनी या दरवाढीच विरोध करत वीजबिलात सुसूत्रता आणावी, वसूल करण्यात येणाऱ्या शिर्षाची स्पष्ट माहिती ग्राहकांना द्यावी, अशी बाजू मांडली होती. शिवाय अगोदर पूर्ण थकबाकी वसुली करावी त्यानंतरच दरवाढ सूचविण्यात यावी, असाही मुद्दा मांडला होता. मात्र वसुली न होताच महावितरणने प्रस्ताव पुढे रेटला आहे. (प्रतिनिधी)