शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या उच्चाटनासाठी घरोघरी ‘दुवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:15 IST

--- नाशिक : मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान पर्व सध्या अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. रविवारी (दि.९) या पर्वाचा २६ ...

---

नाशिक : मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान पर्व सध्या अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. रविवारी (दि.९) या पर्वाचा २६ वा उपवास (रोजा) समाजबांधवांनी पूर्ण केला. यानंतर संध्याकाळचे नमाज पठण पार पडल्यानंतर ‘शब ए कद्र’ला प्रारंभ झाला. यानिमित्ताने घरोघरी पारंपरिक पद्धतीने नमाज, कुराण धर्मग्रंथाचे आबालवृद्धांनी पठण करत कोरोनासारख्या आजाराचे समूळ उच्चाटन व्हावे याकरिता ‘दुवा’ मागितली. शासनाच्या निर्बंधांचे पालन करत कुठल्याही मशिदींमध्ये सामूहिक सोहळा पार पडला नाही.

धार्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त असलेल्या ‘शब ए कद्र’ची मोठी रात्र शहर व परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली. मशिदींवर करण्यात आलेल्या आकर्षक रोषणाईने परिसर उजळून निघाला होता. जुने नाशिक, वडाळारोड, वडाळागाव, नाशिकरोड, देवळाली गाव, देवळाली कॅम्प आदी भागातील मशिदींना रोशणाईने झळाळी प्राप्त झाल्याचे चित्र होते.

दरम्यान, या रात्रीच्या औचित्यावर विविध भागांमध्ये शाळकरी चिमूकल्यांनीसुद्धा निर्जळी कडक उपवास केला.

दरवर्षी रमजान पर्वाचा २६वा उपवास सोडल्यानंतर शब ए कद्र साजरी केली जाते. या रात्रीच्या औचित्यावर मशिदींमधून विविध धार्मिक धार्मिक कार्यक्रम होतात. समाजबांधव एकत्रितपणे कुराण पठण करतात आणि अल्लाहच्या दरबारी दुवा मागतात. तसेच मशिदीचे मौलवी, सेवेकरी (खादीम) यांचा विश्वस्तांकडून सत्कार केला जातो. कोरोनाचे सावट असल्याने हा सोहळा यंदाही कोणत्याही मशिदीत पार पडला नाही. धर्मगुरूंचे प्रवचनही झाले नाही.

या रात्रीत धर्मग्रंथ कुराण पृथ्वीतलावर अवतरीत करण्यात आल्याचे धर्मगुरूंकडून सांगितले जाते. मागील वर्षीप्रमाणे यंदाही या रात्रीवर कोरोनाचे सावट राहिले. कोरोनाच्या साथीमुळे शासनाच्या वतीने धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. कडक निर्बंधांमुळे या विशेष रात्रीलाही मशिदींमध्ये नमाजपठण झाले नसल्याचे शहर ए खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांनी सांगितले.